Tuesday, September 15, 2026
Home बॉलीवूड ‘हाय प्रोफाइल असण्याची किंमत मोजावी लागते’, म्हणत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आर्यनची चिंता

‘हाय प्रोफाइल असण्याची किंमत मोजावी लागते’, म्हणत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली आर्यनची चिंता

गीतकार जावेद अख्तर जे अनेकदा त्यांच्या विधानांमुळे वादात अडकत असतात. त्यांच्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. किंबहुना, जावेद अख्तर यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, त्यांच्या हाय प्रोफाइल स्वभावामुळे चित्रपटसृष्टीला अनेकदा लक्ष्य केले जाते आणि त्यासाठी त्यांना किंमत मोजावी लागते. अख्तर साहेबांचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात अटकेत आहे.

मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जावेद अख्तर यांनी बॉलिवूडबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांना असे विचारण्यात आले होते की, सोशल मीडियावर हे पसरले आहे की, आर्यन खानविरुद्धचा गुन्हा चित्रपटसृष्टीला जाणूनबुजून लक्ष्य करून नोंदवण्यात आला आहे. यावर भाष्य करताना गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, “हाय प्रोफाईल असण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीला ही किंमत मोजावी लागत आहे. जेव्हा तुम्ही हाय प्रोफाईल असता तेव्हा लोकं तुम्हाला खाली खेचण्याचा आनंद घेतात, ते तुमच्यावर घाण फेकतात. जर तुम्ही काहीच नसाल, तर कोणाकडे तुमच्यावर दगड फेकण्यासाठी वेळ आहे?” अल्मास विराणी आणि श्वेता समोटा यांच्या चेंजमेकर्स पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी लेखक अख्तर यांनी हे वक्तव्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा २३ वर्षीय मुलगा आर्यन खानला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर ताब्यात घेतले होते. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन व्यतिरिक्त, तपास यंत्रणेने या प्रकरणात आणखी सात जणांना अटक केली आहे. या सात जणांच्या नावांमध्ये मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सतिजा आणि विक्रांत छोकर यांचा समावेश आहे.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मते, छाप्यादरम्यान १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या २२ गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत परदेशी नागरिक आणि कथित अं’मली पदार्थ तस्करांसह एकूण वीस जणांना अटक करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

वामिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला नेटकऱ्यांनी विचारले, आई-बाबा कधी होणार?

हे देखील वाचा