Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अनन्या पांडे जगातील सर्वात मोठी मूर्ख’, म्हणत ‘या’ स्टारकिडला एनसीबी चौकशीला बोलावण्याचा कमाल खानचा दावा

मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने शाहरुख खानच्या लेकाला आर्यन खानला अटक केली. त्याला अनेक वेळा कोर्टात हजार करण्यात आले, मात्र कोर्टाने त्याला अजूनही जामीन मंजूर केला नाही. सध्या त्याची न्यायिक कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचा जामीन नेहमीच कोर्टाने फेटाळला आहे. शाहरुख खान आर्यनला जामीन मिळावा यासाठी जंग जंग पछाडत आहे. मात्र त्याला अजूनही यश आले नाही.

नुकतीच एनसीबीची टीम शाहरुख खानच्या घरी आणि अनन्या पांडेच्या घरी तपासासाठी पोहचली होती. या प्रकरणात अनन्या पांडेचे नाव आल्यामुळे सर्वांचेच डोळे मोठे झाले आहे. आर्यन खानच्या चॅटमधून अनन्याचे नाव समोर आल्याने तिची चौकशी एनसीबीने सुरु केली आहे. या सर्व प्रकरणावर स्वयंघोषित फिल्म समीक्षण असणाऱ्या कमाल आर खानने ट्विट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटमध्ये त्याने अनन्याला सर्वात मूर्ख म्हटले आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1451089236401197058?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1451089236401197058%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fphoto-gallery%2Fentertainment%2Fbollywood%2Fkamaal-r-khan-called-ananya-panday-a-fool-if-she-has-left-any-evidence-says-ncb-might-call-shanaya-kapoor-next-for-interrogation

कमाल आर खानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले, “अनन्या पांडे या जगातील सर्वात मूर्ख व्यक्ती असेल, जर तिने मागच्या २० दिवसात काही पुरावे सोडले असतील तर.” कमाल आर खानने सांगितले की, “हा सर्व तपास फक्त शाहरुख खानला त्रास देण्यासाठी केला जात आहे. कारण तो सरकारचे ऐकत नाही. एनसीबी ही भारत सरकारच्या अखत्यारीत येणारा विभाग आहे. अरबाज हा अनन्या आणि अलाया एफ चा मित्र आहे.”

पुढे त्याने लिहिले, “ते वाटत आहे की, लवकरच एनसीबी शनाया कपूरला देखील चौकशीसाठी बोलावतील.” त्याने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, “जर खरंच आर्यन आणि अनन्या चॅटवर अं’मली पदार्थांबद्दल बोलत असतील आणि हा गुन्हा असेल तर एनसीबी शनाया कपूरला देखील चौकशीसाठी बोलावतील.”

https://twitter.com/kamaalrkhan/status/1451141510251089935?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1451141510251089935%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Fphoto-gallery%2Fentertainment%2Fbollywood%2Fkamaal-r-khan-called-ananya-panday-a-fool-if-she-has-left-any-evidence-says-ncb-might-call-shanaya-kapoor-next-for-interrogation

अनन्या आणि सुहाना खान या दोघी खूप जुन्या आणि घट्ट मैत्रिणी आहेत. अनेकदा त्या पार्टीलासोबत पहिल्या गेल्या आहेत. या प्रकरणात अनन्याचे नाव आल्याने एनसीबीला तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे की, तिला या अं’मली पदार्थांचा पुरवठा करण्याबद्दल काय माहित आहे. एनसीबीने तिची २१ ऑक्टोबरला चौकशी केली असून, २२ ऑक्टोबरला तिची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनन्या शाहरुख खानला म्हणाली होती ‘सेकंड डॅड’, नेमकं प्रकरण काय?

-आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

-‘डीडीएलजे’ चित्रपटाला २६ वर्षे पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने नकार दिल्याने शाहरुख बनला ‘किंग ऑफ रोमान्स’

हे देखील वाचा