Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड याला म्हणतात नशीब! सहाय्यक दिग्दर्शकाचे काम मागायला गेलेल्या जिमीला थेट मिळाली अभिनेत्याची ‘ही’ भूमिका

याला म्हणतात नशीब! सहाय्यक दिग्दर्शकाचे काम मागायला गेलेल्या जिमीला थेट मिळाली अभिनेत्याची ‘ही’ भूमिका

जिमी शेरगिल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो. जिमीने ‘माचिस’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सध्या तो इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता असून अनेक दर्जेदार चित्रपटात त्याने काम केले आहे. तत्पूर्वी ‘माचिस’ चित्रपटात त्याला संधी कशी मिळाली याची एक रंजक गोष्ट जिमीने सांगितली.

बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिलने ‘माचिस’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. नुकतेच या चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाने अनेक नवीन कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणले होते. यामधील महत्त्वाचे नाव म्हणजे जिमी शेरगिल. पदार्पणाच्या चित्रपटातच भरभरुन यश मिळणे ही कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाची आणि सौभाग्याची बाब असते. परंतु या चित्रपटात काम करण्याची संधी मिळण्यामागे त्याचा एक रंजक किस्सा आहे जो ऐकून तुम्हीही अवाक व्हाल. चित्रपटाच्या निर्मात्यांकडे सहायक दिग्दर्शकाची नोकरी मागायला गेलेल्या जिमीला थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ज्यामुळे तो रातोरात स्टार झाला होता. खुद्द जिमीने याबाबत खुलासा केला.

या चित्रपटाच्या भूमिकेबद्दल बोलताना जिमीने सांगितले की चित्रपटाची तयारी सुरू होती. त्याचवेळी तो गुलजार साहेबांकडे सहाय्यक दिग्दर्शकाच्या पदासाठी नोकरी मागायला गेला. चर्चेदरम्यान जेव्हा गुलजार साहेबांना त्याने अभिनयाचे क्लास लावले आहेत असे समजले तेव्हा त्यांनी त्याला विचारले की, मग निर्मिती क्षेत्रात का येत आहेस? त्यावेळी त्यांनी जिमीला एक स्क्रिप्ट वाचायला दिली. त्यावेळी त्याने एका दमात सगळी स्क्रिप्ट वाचून दाखवली. तेव्हा यांनी त्याला विचारले की कोणते पात्र तुला जास्त आवडले? तेव्हा त्याने सांगितले की जयमल सिंग कारण दोघांचे टोपणनाव ‘जिमी’ हेच होते. त्यावेळी गुलजार साहेब हसले आणि त्यांनी जिमीला चित्रपटात भूमिका दिली.

याबद्दल बोलताना जिमी म्हणाला की “यापेक्षा सुंदर सुरूवात कोण करू शकते? मला माहीत होते की मी आता सुरक्षित हातात आहे. परंतु याबरोबरच मला भूमिकेनुसार काम करण्याचा दबाव देखील होता. कारण याआधी मी कधीही अभिनय केला नव्हता.” जिमीने सांगितले की पहिल्या सीनवेळी तो खूपच निराश झाला होता. त्यावेळी गुलजारसाहेब बिनधास्तपणे कोणती वाक्य कशी बोलायची आणि भूमिका कशी करायची याबद्दल माहिती त्याला सांगत होते.

‘माचिस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी असे बोलले जात होत की चित्रपट साधारणच यशस्वी होईल. परंतु प्रदर्शनानंतर चित्रपटाला मिळालेल्या यशाने सगळेच चकित झाले. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. याबद्दलच्या आठवणी सांगताना जिमी म्हणाला की “पंजाबमधील त्याचे नातेवाईक ट्रॅक्टर, ट्रक भरभरुन चित्रपट पाहायला जात होते आणि त्याचे फोटो जिमीला पाठवत होते.” या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री तब्बूला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याचबरोबर चित्रपटातील गाणी सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा