बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे जबरदस्त चर्चेत आहे. जान्हवीने नुकतेच तिचे बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोशूट केले आहे. त्यातलेच काही फोटो जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहे. फोटोंमधून जान्हवीच्या घायाळ करणाऱ्या अदा तिच्या फॅन्सला चांगल्याच आवडत आहे.
जान्हवी सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर सक्रीय असते. ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो तिच्या अकाऊंटवरून शेयर करत असते. जान्हवीने सध्या पोस्ट केलेल्या फोटोजला भरभरून लाईक्स मिळत आहे. तिचे हे फोटो लोकांना आकर्षित करत असून, इंटरनेटवर हे फोटो खूप वायरल होत आहे.
काळया रंगाच्या ऑफ शोल्डर वेस्टर्न ड्रेसमध्ये जान्हवी या फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंची स्तुती करताना तिचे फॅन्स थकत नाहीये. या फोटोंमध्ये सर्वात जास्त आकर्षक दिसत आहे ते तिचे डोळे. तिचे काळेभोर डोळे लोकांना जास्त आकर्षित करत आहे. या फोटोंमध्ये जान्हवी अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
मल्याळम चित्रपट ‘हेलन’च्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवी कपूरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी चर्चा मात्र नक्कीच सुरु आहे.
जान्हवीकडे सध्या अनेक चित्रपट असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु आहे, मात्र अद्याप अजूनही कोणतीच ठोस बातमी जान्हवीकडून आलेली नाही. जान्हवी शेवटची ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या सिनेमात दिसली होती. तिचा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला पाहिजे तितके यश मिळाले नाही. असे असले तरीही जान्हवीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक मात्र करण्यात आले होते.










