Saturday, April 5, 2025
Home बॉलीवूड किती भारी ना! आईसोबत रुबीनाने चुलीवर बनवला पराठा; व्हिडिओ पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

किती भारी ना! आईसोबत रुबीनाने चुलीवर बनवला पराठा; व्हिडिओ पाहून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

अभिनेत्री रुबीना दिलैकला चाहते अनेक नावांनी ओळखतात. कोणी तिला ‘छोटी बहू’ म्हणतो, तर कोणी ‘लेडी बॉस.’ लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १४’ विजेती रुबीना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच मालदीवमध्ये तिने तिच्या मॉडर्न आणि बोल्ड लूकने चाहत्यांना चकित केले होते. आता तिच्या बोल्ड लूकनंतर तिचा ‘पहाडी स्वॅग’ चाहत्यांना आवडत आहे. मायानगरीपासून दूर असलेल्या डोंगरावर रुबीना घरातील कामात तिच्या आईला मदत करताना दिसत आहे. ‘लेडी बॉस’चा हा अवतार चाहत्यांना आवडत आहे.

रुबीना सध्या शहराच्या गजबजाटापासून दूर डोंगरात आपल्या कुटुंबासह सुट्टी घालवत आहे. रुबीनाही तिच्या आईला घरात खूप मदत करते, ज्याचे दृश्य या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. स्वयंपाकघरात बनवलेल्या लाकडाच्या चुलीजवळ आई एका बाजूला बसलेली दिसत आहे आणि रुबीना दुसऱ्या बाजूला बसलेली दिसत आहे. तिचे कपडे बघून असे वाटते की, तिथे खूप थंडी आहे, ती तिच्या आईसोबत किचनमध्ये मोजे आणि स्वेटर घालून बसली आहे.

आई बटाट्याचा पराठा बनवताना दिसत आहे, तर मुलगी चुलीवर पराठा भाजताना दिसत आहे. रुबीनाच्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही चाहत्यांनी याला “पहाडी स्वॅग,” म्हटले आहे. तिला अशाप्रकारे घरी काम करताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

रुबीनाच्या व्हिडिओ आणि फोटोंवर चाहते कमेंट आणि लाईक करत आहेत. सध्या ती सुट्टीच्या मूडमध्ये आहे आणि आता ती तिच्या पतीसोबत तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी तिच्या घरी गेली आहे.

रुबीना बर्‍याच दिवसांपासून सतत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. नुकतीच रुबीना पती अभिनव शुक्लासोबत मालदीवच्या ट्रिपवर गेली होती, तिथून तिने अनेक सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘अर्ध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सगळं चांगलं सुरू असतानाच ‘त्या’ कारणामुळे अर्चनाने मारली कृष्णाला लाथ; व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘केबीसी १३’मध्ये स्पर्धकाने केले ‘असे’ काही; अमिताभ बच्चन म्हणाले, ‘स्वप्नातही विचार केला नव्हता…’

-रिलीझ होताच चाहत्यांच्या ओठांवर रुळतंय प्रमोद प्रेमीचे ‘हे’ गाणे, पाहायला मिळाला महापर्वचा महिमा

हे देखील वाचा