‘बिग बॉस ओटीटी’ संपला की आता ‘बिग बॉस १५’ सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’च्या विजेत्याचा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांना समजत नाही की, हे कोण आहे? फोटो पाहून ओळखणे खूप अवघड आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, ती कोण आहे आणि ती अशा अवतारात का दिसली? चला तर मग जाणून घेऊया ही मुलगी कोण आहे.
‘बिग बॉस’ विजेतीचा लूक पाहून झाले थक्क
ही दुसरी तिसरी कोणी नसून ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल आहे. यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण असले, तरी हे खरे आहे. दिव्या अग्रवालचे हे फोटो व्हायरल होत आहेत. हे तिच्या वेब सीरिजचे पात्र आहे, जे खूपच भयावह आहे. हा लूक एस्थेटिक मेकअपच्या माध्यमातून केला आहे. अल्ट बालाजीच्या ‘कार्टेल’ या वेबसिरीजमध्ये दिव्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसत आहे. तिने सिरियल किलरची भूमिका साकारली आहे.

या फोटोमध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या एका किन्नरच्या अवतारात दिसत आहे. दिव्याने लाल रंगाची साडी आणि हेवी दागिने घातलेले दिसत आहेत. मेकअपसोबतच चेहऱ्यावर दाढीही दिसते. दिव्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते तिला ओळखू शकत नाहीत. याआधीही तिचे फोटो व्हायरल झाले होते. एकामध्ये ती वृद्ध पुरुषाच्या भूमिकेत दिसली होती, तर एकामध्ये ती हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या गेटअपमध्ये होती. काही दिवसांपूर्वी तिचा फोटो एका वृद्ध महिलेच्या लूकमध्ये व्हायरल झाला होता. प्रत्येक लूकमध्ये तिला ओळखणे कठीण झाले होते. तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर यापैकी दोन लूकचे फोटो पोस्ट केले होते.
आधीच अनेक प्रोजेक्ट केले आहेत पूर्ण
‘स्प्लिट्सविला १०’ फेम आणि ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ या चित्रपटातून आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री दिव्या अग्रवाल अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या नवीन वर्जनमध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ची ती विजेती ठरली आहे. दिव्या खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि बिनधास्त आहे आणि तिची स्टाइल ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी उडवला थरकाप, तर कोणी पाडली भुरळ; पाहा ‘या’ अभिनेत्रींचा लक्षवेधी ‘हॅलोविन लूक’
-‘बिग बॉस’ विजेतीचा भयावह लूक पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे, एक नजर टाकाच
-‘बिग बॉस ओटीटी’ विजेत्या दिव्याने केला बॉयफ्रेंड वरुणसोबतच्या वेडिंग प्लॅनचा खुलासा, म्हणाली…










