अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन होय. ऐश्वर्या सोमवारी (०१ नोव्हेंबर) आपला ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. पन्नाशीच्या जवळ पोहोचलेली ऐश्वर्या आजही तितकीच सुंदर आणि फिट दिसते. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी आहे, ज्यांच्या मागे संपूर्ण जग दीवाने आहे. ऐश्वर्या आज जितकी सुंदर दिसते, तितकीच सुंदर ती लहानपणीही दिसायची.
तुम्ही ओळखलंत का ऐश्वर्याला?
अभिनेत्री वाढदिवशी तिचा एक जुना फोटो जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर हा ग्रूप फोटो आहे. त्यामुळे या फोटोत तुम्हाला ऐश्वर्याला शोधण्यासाठी जरा मेहनत घ्यावी लागणार आहे. ऐश्वर्याचे थ्रोबॅक फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (Actress Aishwarya Rai Birthday Can You Recognise Aishwarya Rai In This Group Photo)
ऐश्वर्याला बनायचं होतं आर्किटेक्ट
अनेक अभिनेत्रींप्रमाणे ऐश्वर्यानेही खूप कमी वयातच काम करण्यास सुरुवात केली होती. शालेय दिवसांमध्येच ऐश्वर्याला मॉडेलिंगच्या अनेक ऑफर येऊ लागल्या होत्या. ऐश्वर्याने आपल्या किशोरवयादरम्यान ५ वर्षे क्लासिकल नृत्य आणि संगीताचे प्रशिक्षण घेतले होते. तिचा आवडता विषय हा झूलॉजी होता आणि सुरुवातीला तिला वैद्यकीय क्षेत्रात कारकीर्द करायची होती. यानंतर अभिनेत्रीचे मन बदलले आणि तिने रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला. ऐश्वर्याच्या मनात आर्किटेक्ट इंजीनियर बनण्याचा विचार आला होता. मात्र, नंतर तिने मॉडेलिंगच्या दिशेने आपले पाऊल टाकले.
ऐश्वर्याचे चित्रपट
ऐश्वर्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात काही खास झाली नव्हती. १९९९ मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून तिला यश मिळाले. यानंतर अभिनेत्रीने ‘ताल’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘सरबजीत’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ यांसारखे अनेक उत्तम चित्रपटात काम केले आहे.
अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘पोन्नीयन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर
-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल