Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड ‘…ती मला आणखीनच खुश करते’, म्हणत अर्जुन कपूरने शेअर केला मलायकासोबत एक सुंदर फोटो

‘…ती मला आणखीनच खुश करते’, म्हणत अर्जुन कपूरने शेअर केला मलायकासोबत एक सुंदर फोटो

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे दोघे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. ते दोघेही अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. अनेकवेळा ते एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच अनेक ठिकाणी ते एकत्र स्पॉट होत असतात. त्या दोघांनी दिवाळीही एकत्र साजरी केली आहे. त्यांचे दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच अर्जुन कपूरने त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे, जो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अर्जुनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आणि मलायकाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो मागून काढलेला आहे. यात ती खाली बघून हसत आहे. फोटोमध्ये मलायकाचा चेहरा दिसत नाहीये. फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच साडीला मॅचिंग अशा गुलाबी रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. तसेच अर्जुन देखील काळ्या रंगाचा कुर्तामध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अर्जुन मलायकाकडे बघून हसताना दिसत आहे. (Actor arjun kapoor share a photo with Malaika Arora on social media)

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “जेव्हा ती माझ्या कोणत्याही गोष्टीवर हसते तेव्हा ती मला आणखी खुश करते.” त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी देखील या फोटोवर कमेंट केल्या आहेत. महीप कपूर, ईशा गुप्ता, भूमी पेडणेकर, करिश्मा शर्मा या कलाकारांनी या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच त्यांचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. तसेच अनेकजण आता लग्न करा असे म्हणत आहेत.

अर्जुन आणि मलायका हे दोघेही कमालीचे कलाकार आहेत. अर्जुनने अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच मलायकाने अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. तिने अनेक रियॅलिटी शोचे परीक्षण केले आहे. त्या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळजात घंटी वाजावी असा होता मलायका अन् अर्जुनचा दिवाळी पार्टीतील लूक, एकदा पाहाच

-एक्सप्रेशन्स असे की, नजर हटविणे कठीण! मलायका अरोराचा व्हिडिओ पाहून‌ चाहते फिदा

-घाईघाईत पँट घालायला विसरली मलायका अरोरा, सोशल मीडियावर सांगितला किस्सा

हे देखील वाचा