Tuesday, April 16, 2024

घाईघाईत पँट घालायला विसरली मलायका अरोरा, सोशल मीडियावर सांगितला किस्सा

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रीमध्ये तिचे नाव समाविष्ट आहे. ती तिच्या कामापेक्षा जास्त हॉटनेसमुळे इंडस्ट्रीमध्ये आणि फॅन्समध्ये ओळखली जाते. मलायका सध्या ४८ वर्षाची आहे. मात्र तिच्या फिटनेसकडे बघून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप अवघड आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते आणि आपल्या चाहत्यांसोबत तिचे फोटोज शेअर करत राहत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून भरपूर लाईक्स देखील मिळतात.

मलायका तिच्या बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाते. परंतु तिच्यासोबत असे काय घडले की, ती घाईघाईत पॅन्ट घालायची विसरली होती. याचा खुलासा तिने सोशल मीडियावर केला होता. तिने इंस्टाग्रामच्या स्टोरीवर लिहिले की, “त्यावेळी कोरोनाबद्दल लोकांच्या मनात खूप दहशत निर्माण झाली होती. लोक खूप घाबरले देखील होते. परंतु सर्वजण एकत्र बाहेर फिरायला जात होते. त्या काळात मी देखील एका हॉटेलमध्ये गेले होते, आणि हाताच्या कोपऱ्याने हॉटेलचा दरवाजा उघडला होता. मी बाथरूमचे सीट आपल्या पायाने उघडले होते. नंतर आपले हात धुवून टिशू पेपरने पुसले. बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर आले आणि मी आपल्या टेबलवर बसले. तेव्हा मला कळाले की, मी पॅन्टवर करायला विसरले होते.”

तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत होती. नुकताच मलायकाने तिचा २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा केला. ती ४८ वर्षाची झाली आणि तिला खूप जणांकडून शुभेच्छा मिळाल्या होत्या. यादरम्यान तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर तिला रोमँटिक अंदाजमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसला. त्याने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ती अर्जुनला किस करताना दिसली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘आजच्या दिवशी आणि इथून पुढे सर्वच दिवस मी तुझ्या चेहऱ्यावर फक्त हास्य बघू इच्छितो. या वर्षी तुझ्या चेहेऱ्यावर जास्त हास्य असो’.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या इंडियाज बेस्ट डान्सच्या शोमध्ये जजची भूमिका निभावत आहे. याआधी ती सुपर मॉडल सीजन २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग केले आहेत. तिचे ‘मुन्नी बदनाम हुई’ हे आयटम सॉन्ग तुफान गाजले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! प्रियांका चोप्राला एका माकडाने मारली होती थोबाडीत

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; तर कंगणा, धनुष, मनोज बाजपेयी ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार

हे देखील वाचा