सोशल मीडियाच्या मार्गाने लाईमलाइट मिळवणे कलाकारांसाठी नवीन नाही. सोशल मीडियाचा वापर करत वेगवेळ्या पद्धतीने चर्चेत राहणे आणि विविध पोस्ट टाकून मीडियाचे लक्ष वेधून घेणे कलाकरांना उत्तम पद्धतीने येते. यासाठीच ते वेगवेगळे व्हिडिओ, अतरंगी रील्स बनवून सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. बॉलिवूडची ‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सोशल मीडियावरील तिची उपस्थिती दर्शवत असते.
यातच आता नोराने तिचा एक डान्स व्हिडिओ इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला असून, यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये नोरा एक विचित्रच डान्स करताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहिले तर सुरुवातीला ती चालत येते आणि अचानक विचित्र डान्स करायला सुरुवात करते. तिच्या हातात मोबाइल आणि पर्स देखील दिसते, मात्र डान्स करायच्या नादात ती ते देखील खाली टाकते आणि डान्स करते. तिचा हा डान्स पाहून बघणाऱ्यांना नक्कीच हसायला आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ फिल्मफेयरने देखील त्यांच्या इंस्टग्राम अकाऊंवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये नोराने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. नोराचा हा डान्स काहींना आवडला आह तर काहींनी नोराला या डान्सवरून ट्रोल देखील केले आहे. नोरा अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील डान्स व्हिडिओने सर्वांचे मनोरंजन करताना दिसते.
नोराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच मिलाप जव्हेरी यांच्या ‘सत्यमेव जयते २’ मध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत जॉन अब्राहाम आणि दिव्या खोसला कुमार आहेत. याआधी तिला अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये पाहिले होते. नोराने तिच्या डान्सने नेहमीच सर्वांचे मनोरंजन केले आहे. तिला डान्सिंग क्वीन म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल
-कॅटरिना आणि विकी कौशल यांची रोका सेरेमनी संपन्न, ‘या’ दिग्दर्शकाच्या घरी गुपचूप झाला कार्यक्रम










