Sunday, April 19, 2026
Home बॉलीवूड तर ‘हा’ आहे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

तर ‘हा’ आहे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

बॉलिवूडमध्ये अनेक मोठे आणि लोकप्रिय कपल आहेत, मात्र जी बात विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्या राय आणि ज्युनियर बच्चन असणाऱ्या अभिषेक बच्चन यांची आहे. ती कोणातच नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक इंडस्ट्रीमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. दोघानांही तुफान फॅन फॉलोविंग आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. चित्रपटांच्या शूटिंग दरम्यानच ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. २००७ साली मोठ्या भव्य आणि आलिशान अशा सोहळ्यात या दोघांनी लगीनगाठ बांधली. अतिशय प्रयत्नांनी त्यांनी त्यांचे नाते जगापासून लपवले होते. आज या दोघांच्या लग्नाला १४ वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाले असून, या दोघांचा सुखी संसार अधिकच आनंदी झाला आहे.

अनेक मुलाखतींदरम्यान या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम ते व्यक्त करताना दिसतात. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने तिला अभिषेकमधील कोणते गुण आवडतात त्याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, “अभिषेक अतिशय सभ्य, उदार आणि धैर्यवान व्यक्ती आहे. त्याचे हे गुण मला त्याच्या जास्त प्रेमात पडतात. तो इतर व्यक्तींप्रमाणे वेद आणि तितकाच शिस्तप्रिय देखील आहे. मला फिटनेसला महत्व देणारे लोकं आवडतात आणि अभिषेक अगदी तसाच आहे.” त्यांच्या लग्नाच्या यशाचे गुपित काय आहे यावर बोलताना ऐश्वर्या म्हणाली, ” आमच्या यशस्वी लग्नाचा मंत्र म्हणजे ‘विश्वास’. जो आमचा एकमेकांवर सर्वात जास्त आहे. आपण आपल्या साथीदारांवर विश्वास ठेवलाच पाहिजे. सोबतच तुमचे हृदय, डोके आणि आत्मावर देखील विश्वास ठेवा. सर्व गोष्टी पारदर्शी ठेवा. असे केले तर तुम्ही तुमचे लग्न अगदी आनंदी आणि सुखाने एन्जॉय करू शकता.”

याबद्दल अभिषेकने सांगितले होते की, “ऐश्वर्यासोबत लग्न केल्यानंतर माझ्या जीवनात अधिक आत्मविश्वास आला. तिने मला माझ्यातला आत्मविश्वास पुन्हा आणायला खूप मदत केली. मी लग्नानंतर अधिक जबादार झालो.”

ऐश्वर्या आणि अभिषेकला आराध्य नावाची मुलगी असून, अनेकदा हे तिघे मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा