हिंदी चित्रपटसृष्टीत बरेच लोक आले आणि गेले. काही माणसं आठवणीत राहतात, पण काही कायमची विसरली जातात. सिंपल कपाडिया यांच्या बाबतीतही असेच झाले. मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची बहीण सिंपल कपाडिया बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी फॅशन डिझाईनमध्ये करिअर करण्याचा विचार केला आणि या क्षेत्रात त्या यशस्वीही झाल्या, परंतु १० नोव्हेंबर २००९ रोजी कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. बुधवारी (१० नोव्हेंबर) त्यांची ११ वी पुण्यतिथी आहे. त्यांची बहीण डिंपल कपाडियाच्या पावलावर पाऊल ठेवत, सिंपल यांनीही चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, परंतु त्यांची कारकीर्द त्यांच्या मोठी बहिणीप्रमाणे यशस्वी होऊ शकली नाही.
सिंपल यांनी वयाच्या १८ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तेही त्यांचा मेहुणा आणि ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत. १९७७ मध्ये आलेल्या ‘अनुरोध’ या चित्रपटात त्या राजेश खन्नासोबत दिसल्या होत्या. मात्र, या चित्रपटात राजेश यांच्यासोबत काम करताना त्या थोडी अस्वस्थ वाटत होत्या. माध्यमांतील वृत्तानुसार, १९७७ मध्ये सिंपल यांनी माध्यमांना मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सिंपल यांनी सांगितले होते की, त्यांना राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्यास अस्वस्थ का वाटत होते.
राजेश खन्ना यांच्यासोबत काम करताना सिंपल का अस्वस्थ झाल्या?
तो चित्रपट ‘बॉबी’ नव्हता आणि त्याची तुलनाही होऊ शकत नाही, असे सिंपल यांनी म्हटले होते. “माझ्या मते मी दुसरी डिंपल होऊ शकत नाही. खरं तर, मला त्यांच्यासोबत काम करताना खूप अस्वस्थ वाटत होतं. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखता तेव्हा त्याला कॅमेऱ्यासमोर वेगळ्या पद्धतीने पाहणं थोडं मजेदार असतं.”
राजेश खन्ना यांच्या व्यतिरिक्त त्या अभिनेता जितेंद्र यांच्या सोबत दिसल्या होत्या. १९७७ ते १९८६ पर्यंत त्यांनी निवडक चित्रपटांमध्ये काम केले. ज्यात ‘चक्रव्यू’, ‘लूटमार’, ‘जाने को देखना है’, ‘जीवन धारा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. सिंपल यांचा शेवटचा चित्रपट ‘प्यार के दो बोल’ होता. चित्रपटांना अलविदा केल्यानंतर सिंपल यांनी १९८७ मध्ये कॉस्च्युम डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांनी अभिनयाला अलविदा केला होता, पण कॉस्च्युम डिझायनर म्हणून त्या हिंदी चित्रपटसृष्टीशी जोडल्या गेल्या.
त्यांनी ‘इन्साफ’, ‘अजूबा’, ‘डर’, ‘रुदाली’, ‘बरसात’, ‘घातक’, ‘जान’, ‘आंटी ४२०’, ‘इंडियन’, ‘कसम’, ‘सोचा ना था’ असे अनेक चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिजाइन केले आहेत. कॉस्च्युम डिझायनर म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ‘गाफला’ होता. विशेष म्हणजे ‘रुदाली’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
कॅन्सरने झाला मृत्यू
सर्व काही ठीक चालले होते, परंतु २००६ मध्ये जेव्हा त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले तेव्हा परिस्थिती बदलली. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते, पण त्यामुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. मात्र, आपले दुःख बाजूला ठेवून सिंपल यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. वेदना होत असतानाही त्या काम करत राहिल्या. खूप उपचार करूनही सिंपल यांचा जीव वाचू शकला नाही. १० नोव्हेंबर २००९ रोजी कॅन्सरने त्यांचे निधन झाले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा
-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका
-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे










