Wednesday, June 3, 2026
Home बॉलीवूड ‘सूर्यवंशी’ नंतर रोहित शेट्टीने सुरू केली ‘सिंघम ३’ चित्रपटाची तयारी, ‘या’ विषयावर आधारित असेल चित्रपट

‘सूर्यवंशी’ नंतर रोहित शेट्टीने सुरू केली ‘सिंघम ३’ चित्रपटाची तयारी, ‘या’ विषयावर आधारित असेल चित्रपट

रोहित शेट्टी याच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्वत्र त्याच्या ‘सिंघम ३’ या चित्रपटाची चर्चा चालू आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रोहित शेट्टी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी काश्मीरमधील रियल लोकेशनवर ‘सिंघम ३’ या चित्रपटाची शूटिंग करणार असून,  या चित्रपटात अजय देवगण शांतीसाठी एंटी नॅशनल विषयावर लढताना दिसणार आहे.

‘सिंघम ३’ बाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ‘सिंघम ३’ ला पोलीस कॉप सीरिजचा भाग मानला जात आहे. चित्रपटावर सध्या काम चालू आहे आणि निर्माते पुढच्या वर्षी शूटिंग चालू करणार आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित तयार केला जाणार आहे. ‘सिंघम ३’ ची सुरुवात तिथून होणार आहे जिथे ‘सूर्यवंशी’ चित्रपट संपला आहे. ‘सिंघम’च्या क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंग आणि अक्षय कुमार ‌हे अँक्शन करताना दिसतील.(Rohit Shetty now preparing singham 3 film will be based on article 370)

परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अजूनही कोणतीच अधिकृत घोषणा केली नसली, तरी ‘सिंघम ३’ हा चित्रपट नक्की कशावर आधारित असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्साहित आहेत. रोहित शेट्टीला आपल्या युनिवर्समधील आयरन मॅनला दुसऱ्या स्तरावर घेऊन जायचे आहे. त्याने या आधी ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ‘सिंघम ३’ बाबत तो अनेक कल्पनांवर काम करत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, हा चित्रपट २०२३ मध्ये स्वातंत्रदिनी प्रदर्शित केला जाणार आहे. रोहित शेट्टी हा चित्रपट नेहमीप्रमाणेच काश्मीर, दिल्ली आणि गोव्यामध्ये शूट करणार आहे. काश्मीरमध्ये कलम ३७० काढले आहे या विषयावर हा चित्रपट बनवला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा