Wednesday, February 11, 2026
Home बॉलीवूड जान्हवीने दुबईच्या रेगिस्तानमध्ये लावला ग्लॅमरसचा तडका; फोटो पाहून कथित एक्स बॉयफ्रेंडही झाला फिदा, म्हणाला…

जान्हवीने दुबईच्या रेगिस्तानमध्ये लावला ग्लॅमरसचा तडका; फोटो पाहून कथित एक्स बॉयफ्रेंडही झाला फिदा, म्हणाला…

बॉलिवूड विश्वातील अनेक कलाकार असे आहेत, जे सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतात. ते नेहमीच स्वतःबद्दल चाहत्यांना काही ना काही माहिती देत असतात. ते चाहत्यांच्या संपर्कात राहणे पसंत करतात. जेणेकरून ते सतत प्रसिद्धीच्या झोतात राहू शकतील. याचप्रमाणे बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. जान्हवी सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहे. आधी सारा अली खानसोबत केदारनाथच्या थंड हवेच्या ठिकाणी ट्रिपला गेली होती आणि आता बहीण खुशी कपूरसोबत दुबईच्या रेगिस्तान ट्रिपला गेली आहे.

जान्हवीने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बहीण खुशीसोबत रेगिस्तानमध्ये ग्लॅमरचा तडका लावताना दिसत आहे.

जान्हवीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर तिचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिची बहीण आणि मैत्रिणींसोबत दुबईच्या रेगिस्तानमध्ये मस्ती करताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये जान्हवीने तपकिरी रंगाचा टँक टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. ती रेगिस्तान राईडचा आनंद लुटताना दिसत आहे. यादरम्यान खुशीने जान्हवीसारखा तपकिरी रंगाचा टँक टॉप आणि काळ्या रंगाचे शॉर्ट्स परिधान केले आहे. खुशीने वरून पांढरा शर्टही परिधान केला आहे.

जान्हवीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “डिजर्ट इन द डेजर्ट.” तर खुशीने कॅप्शनमध्ये “व्रूम-व्रूम,” असे लिहिले आहे.

जान्हवीचे अनेक लेटेस्ट फोटो पाहून चाहते आणि तिचे मित्र सोशल मीडियावर भरपूर कमेंट करत आहेत. जान्हवीला पाहताच तिचा कथित एक्स बॉयफ्रेंड शिखर पहरिया देखील स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. कमेंट करताना त्याने लिहिले की, “माशाल्लाह.”

जान्हवी कपूर-खुशी कपूरच्या फोटोंवर तिचे काका म्हणजेच अभिनेता संजय कपूर, आलिया कश्यप, बहीण अंशुला कपूर यांनी फायर, हार्ट इमोजी वापरून कमेंट केली आहे. जान्हवीच्या या फोटोंना आतापर्यंत ८ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरसोबत ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रूही’ देखील याच वर्षी प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘दोस्ताना २’ आणि ‘गुड लक जेरी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा