Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड पेढे वाटा पेढे! वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई, नावेही केली जाहीर

पेढे वाटा पेढे! वयाच्या ४६ व्या वर्षी प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई, नावेही केली जाहीर

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब आहे. ग्लॅमरपासून जरी लांब असली, तरी देखील ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असतेच असते. अशातच प्रीती झिंटाने एक गोड बातमी शेअर केली. तिने सांगितले आहे की, ती आणि तिचा पती जेन गुडइनफ आज आई- वडील बनले आहेत. तसेच तिने हे देखील सांगितले की, त्यांच्या घरात दोन जुळ्या मुलांच्या आवाजाचा किलबिलाट होत आहे. ते दोघे एका मुला आणि एक मुलीचे आई वडील झाले आहेत. प्रीती ४६ व्या वर्षी सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली आहे.

प्रीतीने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही गोड बातमी दिली आहे. तिने ही बातमी देत तिचा हा प्रवास देखील शेअर केला आहे. तिने तिच्या पतीसोबत एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Preity Zinta and gene good enough welcome twins via surrogacy reveals babies name)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुम्हा सगळ्यांसोबत आज मला एक मोठी गोड बातमी शेअर करायची आहे. जेन आणि मी आज खूप खुश आहोत. कारण आम्ही आमची जुळी मुलं जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ यांचे आमच्या कुटुंबात स्वागत केले आहे.”

तिने पुढे लिहिले आहे की, “आयुष्यातील एक मोठ्या वळणावर आम्ही खूप उत्साहित आहोत. मी डॉक्टर्स, नर्स आणि आमच्या सरोगेटचे आभार मानते. तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम.” यासोबत तिने काही ईमोजी देखील शेअर केल्या आहेत.

प्रीतीच्या लग्नाच्या पाच वर्षानंतर त्यांच्या घरात हा आनंद आला आहे. त्यांची ही आनंदाची बातमी ऐकून सोशल मीडियावर सगळे त्यांना शुभेच्छा देत आहेत. प्रीती आणि जेनने २९ फेब्रुवारी २०१६ मध्ये लग्न केले आहे.

जेन हा प्रीतीपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. तो अमेरिकेचा रहिवाशी आहे. त्या दोघांनीही कोणालाही न सांगता गुपचूप लग्न केले होते. लग्नाच्या ६ महिन्यानंतर त्यांनी ही बातमी सगळ्यांना सांगितली. आता ते दोघेही अमेरिकेमध्येच राहतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-अभिनेता आयुषमन खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग

-Video: फॉर्म्युला फोर कार रेसर अभिनेत्री ‘मनिषा केळकर’ने अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन

हे देखील वाचा