Sunday, October 6, 2024
Home कॅलेंडर सोपे नव्हते मोनालिसाचे आयुष्य, अभिनयापूर्वी हॉटेलमध्ये करायची काम; तर लैंगिक शोषणाचीही झालीय शिकार

सोपे नव्हते मोनालिसाचे आयुष्य, अभिनयापूर्वी हॉटेलमध्ये करायची काम; तर लैंगिक शोषणाचीही झालीय शिकार

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री मोनालिसाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मोनालिसाने हिंदी चित्रपटापासून भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. टेलिव्हिजनच्या दुनियेतील ती एक चमकता तारा आहे. भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त मोनालिसा टेलिव्हिजनच्या दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. ती रविवारी (२१ नोव्हेंबर) तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. बंगालमध्ये जन्मलेल्या अंतरा बिस्वासला भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतून नाव आणि प्रसिद्धी मिळाली आहे.

बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिची लोकप्रियता खूप वाढली. त्यानंतर तिला अनेक हिंदी मालिकांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आज मोनालिसाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक खळबळजनक घटना जाणून घेऊया. चाहते मोनालिसा एक आनंदी जिंदादिल मुलगी म्हणून पाहतात. मात्र ती एकेकाळी खूप घाबरलेली असायची. लहान वयातच तिला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले.

मोनालिसाने एकदा या घटनेबद्दल स्वतः खुलासा केला होता की, ती केवळ ११ वर्षांची असताना तिला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. मोनालिसाच्या म्हणते की, “माझ्या आयुष्यात अनेक टप्पे आले. पण मला सर्वात विचित्र गोष्ट वाटली जेव्हा कोलकाता येथे फिरण्याच्या बहाण्याने एका माणसाने माझे लैंगिक शोषण केले.” यादरम्यान तिला काहीच समजत नसल्याचे मोनालिसाने सांगितले होते. ती म्हणते, “ही घटना घडली तेव्हा मी खूप लहान होते आणि मला समजले नाही. मला धक्का बसला.”

मोनालिसाने एका मुलाखतीत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या अनुभवाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, “सुरुवातीला जेव्हा मी मुंबईला पोहोचले तेव्हा मला एका चित्रपटात छोटी भूमिका आणि भोजपुरी चित्रपटात सहाय्यक भूमिका मिळाली. पण काही वेळाने माझे मन रमले नाही मग मी परत आले होते.”

नंतर २००४ मध्ये मोनालिसा पुन्हा मुंबईत राहण्यासाठी आली. त्यानंतर तिने पंजाबी व्हिडिओपासून ते बी-ग्रेड चित्रपटांपर्यंत सर्व प्रकारची कामे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला भोजपुरी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला. मोनालिसा एका साध्या कुटुंबातील आहे, तिला डान्स आणि गाण्याची कला तिच्या आईकडून मिळाली.

मोनालिसा जेव्हा १६ वर्षांची होती, तेव्हा तिने कोलकत्यातील काही हॉटेलमध्ये ‘गेस्ट रिलेशन एक्झिक्युटिव्ह’ म्हणून काम केले होते. यादरम्यान त्याची निर्माते आणि इव्हेंट कंपनीतील लोकांशी ओळख झाली आणि तिला अभिनयाच्या ऑफर्स येऊ लागल्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा