Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड कोरोनानंतर वजन वाढल्यामुळे रुबीना दिलैकला युजर्स म्हणाले, ‘जाडी,’ मग अभिनेत्रीने ‘अशी’ घेतली शाळा

कोरोनानंतर वजन वाढल्यामुळे रुबीना दिलैकला युजर्स म्हणाले, ‘जाडी,’ मग अभिनेत्रीने ‘अशी’ घेतली शाळा

अभिनेत्री रुबीना दिलैकला चाहते अनेक नावांनी ओळखतात. कोणी तिला ‘छोटी बहू’ म्हणतात, तर कोणी लेडी बॉस. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १४’ विजेती रुबीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर सक्रिय असण्यासोबतच ती तिच्या फिटनेसबाबतही खूप जागरूक आहे. मात्र, यापूर्वी ती कोरोनाच्या संसर्गाच्या विळख्यात सापडली होती. त्यामुळे ती बरी झाल्यापासून तिचे वजन वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत अनेक चाहत्यांना तिचा हा नवा लूक फारसा आवडलेला नाही. इतकेच नाही, तर सोशल मीडिया युजर्स तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

त्याचवेळी सततच्या ट्रोलिंगला कंटाळून आता रुबीनाने सोशल मीडियावर या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. रुबीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नोट शेअर करून आपली बाजू सर्वांसमोर ठेवली आहे. ट्विटरवर एक लांबलचक नोट पोस्ट करत रुबीनाने लिहिले की, “माझ्या प्रिय शुभचिंतकांनो, मी बऱ्याच काळापासून लक्षात घेत आहे की, माझे वाढलेले वजन तुम्हाला त्रास देत आहे. यामुळे तुम्ही मला दररोज वाईट मेसेज आणि मेल पाठवत आहात.”

तिने पुढे लिहिले की, “जर मी पीआर ठेवत नाही, तर तुम्हाला माझी क्षमता दिसत नाही का? मी लठ्ठ आहे, म्हणून तुम्ही मला माझे चाहते न राहण्याची धमकी देत ​​आहात. मी चांगले कपडे घालत नाही आणि मोठे प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी मेहनत करत नाही. तुमच्यासाठी माझी प्रतिभा आणि मेहनत यापेक्षा माझे शारीरिक स्वरूप महत्त्वाचे आहे हे पाहून मला खूप वाईट वाटते.”

“हे माझे जीवन आहे आणि त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत आणि तुम्ही सर्व माझ्या आयुष्याचा एक टप्पा आहात. मी माझ्या चाहत्यांचा खूप आदर करते, त्यामुळे स्वत:ला माझे चाहते म्हणू नका,” असेही तिने पुढे लिहिले. रुबीनाची ही नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रोलर्सबद्दलची त्यांची नाराजी तिच्या या चिठ्ठीतून स्पष्टपणे दिसून येते.

त्याचवेळी चाहतेही रुबीनाच्या या नोटवर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान काही चाहते तिच्यासोबत कायम उभे राहिल्याची चर्चा आहे. रुबीनाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी लिहिले की, “तू जशी आहेस, तसे आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.”

विशेष म्हणजे अभिनेत्रीने सप्टेंबरमध्ये एका पोस्टद्वारे सांगितले होते की, कोरोनामधून बरी झाल्यानंतर तिचे वजन सुमारे ७ किलो वाढले आहे. तिने सांगितले होते की, वाढत्या वजनामुळे ती खूप अस्वस्थ आहे. त्याचबरोबर तिचा आत्मविश्वासही खूप कमी झाला आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकतेच तिचे नवीन गाणे ‘शाहरुख खान’ प्रदर्शित झाले आहे, जे चाहत्यांना खूप आवडले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा कडकच ना! आयफेल टॉवरसमोर नेहा कक्करने रोहनप्रीतला केले लिप-लॉक किस, युजर म्हणाला, ‘सावधान…’

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या लग्नातील खास व्हिडिओ व्हायरल, केमिस्ट्री पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

-‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा