Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पतीसोबत विभक्त झाल्याच्या बातम्यांदरम्यान प्रियांका चोप्राने शेअर केली पहिली पोस्ट, तुम्ही पाहिली का?

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे पसंत करते. प्रियांका सध्या खूप चर्चेत आहे. नुकतेच प्रियांकाने तिच्या नावामधून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले, तेव्हापासून हे दोघे वेगळे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अफवांदरम्यान आता प्रियांकाने तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे, ज्याला खूप पसंती मिळत आहे.

प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या नावापुढचे जोनासचे हे नाव काढून टाकल्यानंतर तिने आता सोशल मीडियावर पहिली पोस्ट टाकली आहे. प्रियांकाने नुकतेच तिच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द मॅट्रिक्स रिसेक्शन’चे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्रियांकाचा फर्स्ट लूकही दिसत आहे.

प्रियांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्रियांकाचा लूकही खूप वेगळा दिसत आहे, ज्याला प्रचंड पसंती देखील मिळत आहे. प्रियांकाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रियांका आंतरराष्ट्रीय स्टार्स कीनू रीव्स, कॅरी-ॲनी मॉस, जाडा पिंकेट स्मिथ यांच्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे हे चौथे पोस्टर आहे, याआधी शेअर केलेल्या पोस्टर्समध्ये प्रियांका दिसली नव्हती. त्यामुळे तिचे चाहते दुःखी झाले होते. या नवीन पोस्टरमध्ये प्रियांकाची व्यक्तिरेखा खूपच प्रभावी दिसत आहे.

प्रियांका चोप्राने तिच्या नावासमोरून पतीचे आडनाव ‘जोनास’ काढून टाकले होते. यानंतर प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी या अफवांना आवर घालण्यासाठी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, “प्रियांकाने असे करण्यामागे कोणतेही कारण नाही, तिने फक्त असे नाव काढून टाकले आहे, प्रियांका आणि निकमध्ये सर्व काही ठीक आहे.”

मधू चोप्रा यांनी प्रियांकाच्या घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्यानंतर अभिनेत्री आणि निकच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सरावादरम्यान मांजरीसोबत खेळताना दिसला विराट, पत्नी अनुष्काने कमेंट करताच म्हणाला, ‘…मुंबईची मांजर’

-आहा कडकच ना! आयफेल टॉवरसमोर नेहा कक्करने रोहनप्रीतला केले लिप-लॉक किस, युजर म्हणाला, ‘सावधान…’

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या लग्नातील खास व्हिडिओ व्हायरल, केमिस्ट्री पाहून चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा