Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘कॅज्युअल सेक्स’ला योग्य मानतो प्रतीक बब्बर; म्हणाला, ‘मीही केलाय प्रयत्न’

‘कॅज्युअल सेक्स’ला योग्य मानतो प्रतीक बब्बर; म्हणाला, ‘मीही केलाय प्रयत्न’

अभिनेता प्रतिक बब्बर लवकरच ‘हिकअप्स ऍंड हुकअप्स’ या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला आहे. यात अभिनेत्री लारा दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरिजमध्ये ती प्रतीकच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. या सीरिजमध्ये सेक्स आणि रिलेशनशिप बोल्ड आणि मॉडर्न स्टाइलमध्ये दाखवण्यात येणार आहे, जे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहू शकता. सीरिजच्या प्रमोशनशी संबंधित मुलाखतीत प्रतीकने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही काही गोष्टी सांगितल्या आहेत.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रतीक म्हणाला की, तो सेक्सला चुकीचा मानत नाही. तो म्हणाला की, “ज्यांचा प्रेमासारख्या गोष्टींवर विश्वास नाही, ते कॅज्युअल सेक्सवर विश्वास ठेवतात.” तो म्हणाला, “मी कॅज्युअल सेक्सचाही प्रयत्न केला आहे. मला असे वाटते की, लोक कधी ना कधी यातून जातात. वन नाईट स्टँड, फ्लिंग, हुकअप्स, यातूनही मी गेलो आहे.”

बोलण्याने समंजसपणा वाढतो
प्रतिकने मुलाखतीत सांगितले की, “हे महिला, पुरुष यापैकी कोणालाही होऊ शकते. या शोबाबत आम्हाला दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोक म्हणतात की, ज्या मुद्द्यांवर शतकानुशतके पडदा पडला आहे ते आम्ही मांडले आहेत. पण काही लोकांचा असा विश्वास आहे की, अशा प्रकारे पवित्र नाते दाखवणे योग्य नाही. माझा विश्वास आहे की, जेव्हा आपण आपल्या कुटुंबासमोर सेक्ससारख्या निषिद्ध गोष्टींबद्दल उघडपणे बोलतो, तेव्हा आपली परस्पर समज आणि बंध वाढतात.”

बहिणीचा घेतो सल्ला
प्रतीक बब्बरने आपल्या बहिणीसोबतच्या बाँडिंगबद्दलही सांगितले. या सीरिजमध्ये तो आपली बहिण लारा दत्तासोबत जेवढा मोकळा आहे, तेवढाच तो आपल्या बहिणीशीही बोलत असतो, असे तो म्हणाला. “मी दीदीकडून सल्ला घेतो, जेव्हा गरज असेल तेव्हा दीदीही माझा सल्ला घेते. अनेक मुद्द्यांवर आपण कुटुंबीयांशी बोलू शकत नाही, असे वर्षानुवर्षे आपल्याला शिकवले जाते, पण तसे नाही. मला वाटते की आपण तरुण पिढीकडून शिकले पाहिजे,” असेही तो म्हणाला आहे.(hiccups hookup prateik babbar on relationship)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ठरलं रे! कियार अन् सिद्धार्थ 2 डिसेंबरला अडकणार लग्न बंधनात?

आईच्या निधनानंतर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या प्रतीक बब्बरने काढून टाकले होते वडिलांचे आडनाव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा