मागील अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची चर्चा चालू आहे. मात्र, त्या दोघांनी अजूनही यावर त्यांची प्रतिक्रया दिलेली नाही. त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत मौन धारण केले आहे. त्यांच्या या लग्नाच्या चर्चांमध्ये कॅटरिना नुकतीच मुंबईमधील एका क्लिनिक बाहेर स्पॉट झाली आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होता दिसत आहेत. हे फोटो पाहून युजर्स अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
कॅटरिना अशी अचानक क्लिनिकमध्ये का गेली असेल, याचे कारण काही सोशल मीडिया युजर्सला समजत नाहीये. कॅटरिनाचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कॅटरिनाने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तसेच तिने काळ्या रंगाचा मास्क लावला आहे. (Actress Katrina Kaif visits clinic ahead of wedding rumo with Vicky kaushal)
या फोटोमध्ये ती क्लिनिकमधून बाहेर येताना दिसत आहे. यात कॅटरिनाने मीडियाकडे बघून हात देखील हलवला आहे, परंतु त्यांना कोणतीही पोझ न देता ती सरळ जाऊन तिच्या गाडीमध्ये बसली. या फोटोमध्ये कॅटरिनाने कोणताही मेकअप केलेला नाही. हा फोटो पाहून युजर्स अनेक प्रश्न विचारत आहेत.
एका युजरने हा फोटो पाहून कमेंट केली आहे की, “लग्नाआधीच प्रेग्नंट झाली की काय?” तसेच दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “लग्न होणार तर आहे ना?” आणखी एकाने लिहिले आहे की, “खूप वाईट झाले, मला नाही वाटत आता लग्न होईल.” यासोबत आणखी एकाने लिहिले आहे की, ही अजून मुंबईमध्येच आहे का?”
मागील अनेक दिवसापासून कॅटरिना आणि विकीबाबत लग्नाच्या चर्चा चालू आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, ते दोघेही सवाई मधोपुरमधील एका किल्ल्यावर लग्न करणार आहेत. कॅटरिना आणि विकीच्या लग्नाबाबत सवाई मधोपूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांची मीटिंग होणार आहे. तसेच त्यांच्या लग्नाबाबत अनेक नियम तयार केले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, विकी आणि कॅटरिना यांच्या लग्नात कोणालाही मोबाईल वापरण्याची परवानगी नसणार आहे. कारण, त्यांना त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायचे नाहीत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नुसता राडा! जगभरात गाजतोय मोहनलाल यांचा ‘मरक्कर’, पहिल्याच दिवशी यूएईत कमावले कोट्यवधी रुपये
-याहूवर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांच्या यादीत ‘हा’ अभिनेता ‘दबंग’ खानलाही देतोय टक्कर, पाहा यादी










