Monday, June 23, 2025
Home भोजपूरी खेसारी लाल यादवचे नवीन रोमँटिक गाणे रिलीझ, महिमा सिंगसोबत लिप- लॉक करताना दिसला अभिनेता

खेसारी लाल यादवचे नवीन रोमँटिक गाणे रिलीझ, महिमा सिंगसोबत लिप- लॉक करताना दिसला अभिनेता

भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव (Khesari lal yadav) हा ट्रेंडिंग स्टारच्या नावानेही ओळखला जातो. त्याच्या हिट म्युझिक व्हिडिओमुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. अभिनेत्याचे कोणतेही व्हिडिओ गाणे प्रदर्शित झाले, तर ते युट्यूबवर ट्रेंड व्हायला सुरू होते. त्याचवेळी त्याची बहुतेक गाणी आजकाल भोजपुरी गायिका अनुपमा यादव (Anupama Yadav) सोबत समोर येत आहेत. जी तुफान व्हायरल होत आहेत. नुकताच या दोन्ही स्टार गायकांचा ‘सईया के रोटी’चा व्हिडिओ लाँच करण्यात आला होता, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे गाणे अभिनेत्री राणीवर (Actress Rani) चित्रित करण्यात आले आहे. यानंतर त्याने ‘गोल गोल रोटी’ गाणे आणले, ज्यामध्ये तो एका वेगळ्याच रुबाबात दिसला. आता तो ‘मुॅंह मारे राजा’मध्ये महिमा सिंगसोबत (Mahima Singh) त्याची जुगलबंदी सादर करत आहे.

खेसारीने शुक्रवारी (३ डिसेंबर) त्यांचे नवीन गाणे प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये तो भोजपुरी अभिनेत्री महिमा सिंगसोबत दिसत आहे. ‘मुह मारे राजा’मध्ये खेसारी अतिशय रोमँटिक अंदाजात दिसत आहे. सुरुवातीच्या व्हिडिओमध्येच खेसारी को-स्टार महिमासोबत लिपलॉक किस करताना दिसत आहे आणि नंतर दोघे स्विमिंग पूलमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत.

संपूर्ण गाण्यात खेसारी आपल्या मैत्रिणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओमध्ये भोजपुरी गायिका महिमाच्या गालावर सतत किस करत आहे आणि त्यामुळेच तिच्या चाहत्यांकडून या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.

काही तासांत हे गाणे ५ लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले असून, ७ हजारांहून अधिक युजर्सनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खेसारी आणि महिमा यांचा देसी रोमान्स भोजपुरी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. ‘मुॅंह मारे राजा’चे गीत प्रिन्स प्रियदर्शी यांनी लिहिले असून संगीत प्रियांशू सिंग यांचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक वर्षांपूर्वीच झाली होती ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ची भविष्यवाणी! व्हायरल होतोय चित्रपटाचा पोस्टर

-कॉमेडियन कृष्णा अभिषेकने केली विकी- कॅटरिनाच्या लग्नाची गुप्त माहिती लीक, सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

-Bigg Boss 15: प्रतीक सहजपालवर भडकली तेजस्वी प्रकाश; म्हणाली, ‘सांगू का, टास्कमध्ये तुझे हात कुठे कुठे लागतात?’

हे देखील वाचा