Sunday, June 22, 2025
Home मराठी सोनाली खरेच्या वाढदिवशी मैत्रीण अमृता खानविलकरने दिले खास सरप्राइज, दणक्यात केले सेलिब्रेशन

सोनाली खरेच्या वाढदिवशी मैत्रीण अमृता खानविलकरने दिले खास सरप्राइज, दणक्यात केले सेलिब्रेशन

मराठी चित्रपटसृष्टीतील सोनाली खरे (Sonali Khare) ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच रविवारी (५ डिसेंबर) रोजी तिने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या वाढदिवशी तिच्या अनेक चाहत्यांनी, कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्या शुभेच्छा तर तिला मिळाल्याच आहेत. या सगळ्यात तिची खास मैत्रीण अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने तिला खास सरप्राइज दिले आहे.

सोनाली आणि अमृताची मैत्री तर सगळ्यांना माहीतच आहे. सोशल मीडियावर अनेकवेळा त्यांचे मैत्री प्रेम दिसून येते. अशातच सोनालीच्या वाढदिवशी अमृताने तिला एक खास सरप्राइज दिले आहे. याचे काही फोटो अमृताने इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केले आहेत. (Amruta Khanvilkar gives special surprise to sonali khare on her birthday)

Sonali-Khare
Photo Courtesy Instagramamrutakhanvilkar

सोनाली रात्री झोपलेली असताना अमृताने केक आणून तिला सरप्राइज दिले आहे. ती अचानक सोनालीला न सांगता तिच्या घरी रात्री केलं घेऊन गेली आणि तिला हे सरप्राइज दिले आहे. वाढदिवस साजरा करताना काही खास फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अमृता आणि सोनाली यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांची मैत्री अनेकांना खूप आवडते. अमृताचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा सोनालीने देखील तिचा वाढदिवस खास अंदाजात साजरा केला होता. त्यांचे हे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.

सोनाली आणि अमृता या दोघी ही मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. तसेच त्या दोघी उत्कृष्ट डान्सर देखील आहेत. त्यांचे डान्स व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा