Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बोल्डनेसची सीमापार! अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मुलीच्या फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने तिच्या दीर्घ कारकिर्दीत उच्च स्थान मिळवले आहे. आता तिच्याप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) हिने देखील सर्वांना वेड लावले आहे. पलक आजकाल इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याआधीच तिने चाहत्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. पलक सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या बोल्ड लूकने ती अनेकदा इंटरनेटचा पारा चढवते. नुकतेच तिने पुन्हा असेच काहीसे केले आहे.

रेट्रो स्टाईलमध्ये दिसली पलक
पलक तिच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये रेट्रो स्टाईलमध्ये दिसत आहे. पलकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक शॉट्ससह फुल स्लीव्ह क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. मोकळ्या केसांवर गॉगल लावून, त्यासह तिने कानात झुमके घातले आहेत. ती वेगवेगळ्या अँगलमध्ये पोझ देत आहे. फोटोंमध्ये ती खूप बोल्ड आणि क्लासी दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोंमध्ये पलकचा बोल्डनेस पाहून चाहते फोटोंवर भरपूर कमेंट करत आहेत.

पलकचे हे फोटो पाहून एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “काय अप्रतिम दिसत आहे.” दुसर्‍या युजरने लिहिले की, “प्रत्येक गोष्टीत लाजवाब.” आणखी एका युजरने लिहिले, “कतई बवाल हो” असे लिहिले. दुसर्‍या युजरने लिहिले, “खरचं बिजली आहेस.”

पलकने याआधीही काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती. या फोटोमध्ये ती तपकिरी रंगाचे जॅकेट उघडून ब्लॅक स्पॅगेटी ब्रा फ्लॉंट करताना दिसली.

‘बिजली-बिजली’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली पलक
पलकच्या करिअरबद्दल बोलायचे झाले, तर तिचा ‘बिजली-बिजली’ हा म्युझिक व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात ती पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूसोबत दिसत आहे.

या गाण्यात पलकची मनमोहक अंदाज पाहायला मिळाला. तिचे हे गाणे यावेळी चाहत्यांच्या ओठावर आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा