टिकटॉक स्टार फैजुची अभिनेत्री रुही सिंगने तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल बिकिनी अवतारातील फोटो शेयर केले आहेत.
तिच्या या बिकिनी अवतारातील फोटो तुफान व्हायरल होत असून, तिच्या फॅन्सकडून या फोटोना भरभरून लाईक्स मिळत आहे.
२९ वर्षीय रुहीला लहानपणापासूनच एक गायिका व्हायचे होते.
नशिबाने ती मॉडेलिंग करायला आणि एक अभिनेत्री झाली.
रुहीला मिस मॉडेल ऑफ वर्ल्ड या किताबाने गौरवण्यात आले आहे.
शिवाय तिला मिस युनिव्हर्स ऑफ पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रुही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, ती नेहमी तिच्या फॅन्ससोबत संवाद साधताना दिसत असते.
रुहीने नुकतेच डिजिटल डेब्यू केले असून, तिची बँग बँग ही वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरिजला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.










