साउथ सुपरस्टार यश हा याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट टाॅक्सिक हा 26 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची रीलीज पुर्वीज खुप चर्चाे झाली. हा चित्रपट गीतू मोहनदास दिग्दर्शित आहे. हा मुळत: मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र शेवटच्या क्षणी त्यांची रीलीज डेट बदलली, त्यामुळे अनेक प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता होती. दरम्यान, यशने चित्रपटासंदर्भात प्रेक्षकांना एक विशेष विनंती करणारी पोस्ट शेअर केली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर मग चला जाणुन घेउया.
अभिनेता यशने (yash) म्हणले आहे कीब, चित्रपट पाहिल्यानंतर स्पॉइलर्स शेअर करु नका. कारण त्यामुळे दुसऱ्याच्या आंनदात व्यत्यय निर्माण होईल. तसेच त्यांने पुढे म्हणले आहे, की, ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा आमच्यासाठी फक्त चित्रपट नाही तर हे जग उभे करण्यासाठी अनेक लोकांचे परिश्रम आमि त्यांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. हा एक अनुभव आहे जो एका समुदायाने मोठ्या पडद्यासाठी तयार केला आहे.
तसेच तो पोस्ट मध्ये पुढे म्हणला आहे की. तुम्ही या चित्रपटासाठी दाखलेले प्रेम आणि ऍडव्हान्स बुकिंगमध्ये दिसलेले प्रेम यासाठी मी खुप आभारी आहे. पण आमची एक विनंती आहे. दुसऱ्यांनाही तसाच अनुभव घेवु द्या, चित्रपटगृहात कोणतेही दृश्य रेकाॅर्ड करुन सोशल मिडियावर पोस्ट करु नका. पुढच्या प्रेक्षकांनाही तसाच अनुभव घेवु द्या. तसेच त्याने पुढे चित्रपटची रिलीज डेट 26 ऑगस्ट 2026 शेअर केली आहे.
हेही वाचा
‘गनमास्टर जी९’ चा टीझर प्रदर्शित; ॲक्शन अवतारात परतला इम्रान हाश्मी










