Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड ‘मुघलांनी देशाला गौरवशाली इतिहास दिला’, म्हणणारे नसरुद्दीन शाह सोशल मीडियावर ट्रोल

‘मुघलांनी देशाला गौरवशाली इतिहास दिला’, म्हणणारे नसरुद्दीन शाह सोशल मीडियावर ट्रोल

जेष्ठ आणि दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शहा जेवढे त्यांच्या प्रभावी आणि मार्मिक अभिनयासाठी ओळखले जातात तेवढेच ते त्यांच्या स्पष्ट व्यक्तव्यांमुळे देखील चर्चेत येतात. अनेकदा त्यांना त्यांच्या वक्तव्यांमुळे ट्रोल देखील झाले आहेत. नुकतेच नसरुद्दीन शहा यांनी मुघलांवर व्यक्तव्य करत त्यांना चांगले म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, मुघलांनी संगीत, नृत्य, पेंटिंग आदी अनेक गोष्टींची परंपरा भारताला दिली. त्यांनी भारतात अनेक ऐतिहासिक आणि गौरवशाली स्मारकं बांधली. आपण तैमूर आणि नादिर शाह यांच्याबद्दल नाही बोलत कारण ते आले आणि गेले. मुघलांनी आपल्याला लुटले नाही. मुघल इथे आली आपला देश बनवण्यासाठी. आपण त्यांना शरणार्थी देखील म्हणू शकतो.

Photo Courtesy: Instagram/naseeruddinshahofficial

नासीरुद्दीन शाह यांच्या या व्यक्तव्यानंतर एकच हंगामा सुरु होण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर तर शाह यांच्या या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेत आहेत. एकाने लिहिले, “आक्रमण करणारे नेहमीच आक्रमणकारी असतात.” अजून एकाने लिहिले, “मुघल आधी रिफ्यूजी म्हणून आले आणि इथल्या लोकांना त्यांनी रिफ्यूजी बनवून ठेवले.” तर एकाने लिहिले, “२०१४ पासून तुम्ही फक्त एक अभिनेता म्हणूनच विचार करतात. तुमच्या धर्मावर तुम्ही कधी लक्षच दिले नाही. तुम्हाला खूप भीती देखील वाटत आहे.” एकाने लिहिले, “प्रवासी उत्तम शब्द होता शरणार्थी नाही. इमारती, संस्कृती, डान्स, संगीत हे मुघलांनी नाही दिले.”

पुढे नसरुद्दीन शाह यांना विचारले गेले की, “नरेंद्र मोदी यांच्या भारतात एक मुस्लिम असल्याच्या नात्याने काय भावना आहेत? यावर ते म्हणले, “मला खूप वाईट वाटते. इतकेच नाही तर एक जोक देखील सहन होत नाही. मला इथे असुरक्षित नाही वाटत कारण हा माझा देश आहे. ते पुढे म्हणाले, “देशात सर्व काही मुस्लिमांना घाबरवण्यासाठी केले जात आहे. जे लोकं मुस्लिमांचा नरसंहार करण्याचे आवाहन करत आहे, ते देशात युद्धाचे आवाहन करत आहे.” नसरुद्दीन शाह नेहमीच त्यांच्या अशा बोलण्यामुळे संकटात आले आहेत.

हेही वाचा :

मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच ऑडिशनमधील विजेत्या कलाकारांचा रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने २०२१ वर्षात त्याला मिळालेल्या यशासाठी मानले प्रेक्षकांचे आभार, म्हणाला…

शर्वरी वाघ आहे सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये? स्वतःच सांगितले त्यांच्या नात्याचे सत्य

हे देखील वाचा