बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल आज जरी फ्लॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जात असली तरी तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. अमिषा जेवढी तिच्या कामासाठी ओळखली जाते तेवढीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील ओळखली जाते. सध्या अमिषा तिच्या ‘गदर २’ या आगामी सिनेमामुळे खूपच प्रकाशझोतात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ती ‘सकीना’च्या भूमिकेत तिच्या फॅन्सला आणि प्रेक्षकांना दिसणार आहे. बऱ्याच दिवसांनी अमिषा या सिनेमाच्या निमित्ताने चित्रपटात काम करताना दिसणार आहे. मात्र आता ती तिच्या एका ट्विटमुळे चर्चेत आली आहे.
अमिषाने नुकतेच फैजल पटेलच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटनंतर यूजर्स असा अंदाज लावत आहे की, अमिषा आणि फैजल एकमेकांना डेट करत आहे. तिच्या या ट्विटला फैजलने देखील रिट्विट केले आहे. मात्र अजूनही त्यांनी त्याच्या नात्याला अधिकृत पद्धतीने जाहीर केले नाही.
Happy bday my darling @mfaisalpatel … love uuuuu … ❤️????????????????????have a super awesome year ❤️???????????? pic.twitter.com/Yworua1hLv
— ameesha patel (@ameesha_patel) December 30, 2021
अमिषाने ३० डिसेंबर २०२१ रोजी ट्विटरवर फैजलसोबत काही फोटो शेअर केले. या फोटोंसोबत तिने फैजलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने तिच्या ट्विटमध्ये लिहिले, “हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग फैजल पटेल. लव्ह यू. तुझे वर्ष शानदार राहो.” यासोबतच तिने अनेक हार्टचे ईमोजी पोस्ट केले आहे. या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या रिलेशनशिपवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. फैजल हा राजकीय नेते अहमद पटेल यांचा मुलगा आहे.
अमिषाच्या या ट्विटनंतर फैजलने त्याची बहीण असलेल्या मुमताजच्या ट्विटचा एक स्क्रिनशॉट शेअर केला. या स्क्रीनशॉटमध्ये लिहिले होते की, “सोशल मीडिया आणि मीडियाला विनंती आहे की, दिलीत केलेले ट्विट अधिक वाचू नये. अमिषा पटेल कुटुंबासारखी आहे. आम्ही तीन पिढयांपासून मित्र आहोत. हा फक्त एक विनोद होता. कृपया याला विनोदासारखे घ्यावे.” सध्या अमिषा तिच्या ‘गदर २’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यात सनी देओल आणि तिची जोडी दिसणार आहे.
हेही वाचा :
नवीन वर्षाच्या रात्री नेहा कक्कर अन् रोहनप्रीतमध्ये घडले ‘असे’ काही, की स्टेजवरच गायिकेला कोसळले रडू
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विशाल-विकास जोडीने घेतले जोतिबाचे दर्शन, पाहा व्हिडिओ