Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड मुलीचे विचित्र प्रश्न टाळण्यासाठी ट्विंकल खन्नाने केला ‘हा’ अप्रतिम उपाय, जाणून तुम्ही देखील व्हाल प्रेरित

मुलीचे विचित्र प्रश्न टाळण्यासाठी ट्विंकल खन्नाने केला ‘हा’ अप्रतिम उपाय, जाणून तुम्ही देखील व्हाल प्रेरित

मातृत्व ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक आई याबद्दल जागरुक असते. अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) तिच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टमध्ये याबद्दल चर्चा करत आहे. ट्विंकल खन्ना म्हणते की, मुलांच्या जिज्ञासा आणि उर्जेला योग्य दिशा देणे हे पालकांचे काम आहे. तिची मुलगी निताराच्या विचित्र प्रश्नांदरम्यान, ट्विंकलने एक युक्ती वापरून पाहिली जी मुलीसाठी देखील चांगली आहे आणि ट्विंकल देखील त्यामध्ये आरामशीर राहते. अशातच आई-मुलीच्या या फोटोला खूप पसंती दिली जात आहे.

अनेक प्रसिद्ध चित्रपट करून आता लेखिका म्हणून आपला ठसा उमटवणारी ट्विंकल खन्ना अनेकदा सामाजिक विषयांवर बोलत असते. तिच्या ताज्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, ट्विंकल मुलांच्या संगोपनाबद्दल पालकांना संदेश देताना दिसली. ट्विंकलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलगी नितारासोबत समुद्राच्या निळ्या पाण्यामध्ये काढलेला एक फोटो शेअर केला आहे. मुलगी नितारासोबतचा हा फोटो पोस्ट करत ट्विंकलने लिहिले की, “माझ्या उत्तरांपेक्षा तिच्याकडे नेहमीच जास्त प्रश्न असतात. त्यामुळे तिचे मन व्यस्त ठेवण्यासाठी तिला एक पुस्तक देऊन मला आराम मिळतो आणि तिचे तोंड बंद राहते.” ट्विंकलचा विश्वास आहे की, अशाप्रकारे ती मुलीला अभ्यासासाठी प्रेरित करते आणि तिची एनर्जी देखील योग्य दिशेने जाऊ शकते.

ट्विंकलच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते तिच्या विचाराचे कौतुक करत आहेत. यावर एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले की, “होय हा खूप चांगला पर्याय आहे, तो मुलांना फोनपासूनही दूर ठेवू शकतो.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, “परफेक्ट आई, परफेक्ट पत्नी.” ट्विंकल आणि मुलगी नितारा एकमेकांच्या खूप जवळ आहेत, ट्विंकल अनेकदा तिच्या मुलीचे किस्से सोशल मीडियावर शेअर करत असते.

ट्विंकल खन्नाने १७ जानेवारी २००१ रोजी अक्षय कुमारसोबत लग्न केले होते. या जोडप्याच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. दोघेही. बॉलिवूडच्या परफेक्ट जोडप्यांपैकी एक आहे. फिल्मफेअरच्या एका फोटोशूटदरम्यान दोघांची भेट झाली होती. इथून दोघांमध्ये जवळीक वाढली. आज या दोघांना आरव आणि मुलगी नितारा अशी दोन मुले आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा