अभिनेता रणवीर सिंगचा टीव्हीवरील ‘द बिग पिक्चर‘ हा शो प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मंचावर अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावतात. त्याचवेळी त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन देखील करतात. त्यासह अनेकदा ते आपल्या आयुष्यातील काही भावनिक क्षण देखील शेअर करतात. यावेळी करण जोहर आणि काजोल ‘द बिग पिक्चर’च्या मंचावर दिसले. यावेळी करणला ट्रिब्यूट करण्यात आले. वडील यश जोहर यांचे बोलणे ऐकून करण भावुक झाला आणि रडू लागला. ‘द बिग पिक्चर’चा नुकताच प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रणवीर आणि करण काजोलसोबत खूप मस्ती करतानाही दिसत आहेत.
वडील यश जोहर यांचे बोलणे ऐकून करण जोहर झाला भावुक
वडील यश जोहर यांचे बोलणे ऐकून करण (Karan Johar) भावुक होतो. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या टॅग लाईनबद्दल यश बोलतात आणि हे ऐकून करण भावूक होतो. यश व्हिडिओमध्ये म्हणतात की, “मला करण जोहरने दिलेल्या या चित्रपटाची टॅगलाईन खूप आवडली. ती तुमच्या वडिलांवर आणि आईवर प्रेम करण्याविषयी आहे. यापेक्षा चांगली भेट दुसरी कोणतीही असू शकत नाही.” व्हिडिओ पाहून करण रडू लागतो. त्यानंतर रणवीर (Ranveer Singh) करणला मिठी मारत सांभाळताना दिसला.
करण जोहर व्यतिरिक्त काजोलही दिसणार ‘द बिग पिक्चर’च्या मंचावर
यावेळी करणला एक डान्स देखील समर्पित करण्यात आला. करण व्यतिरिक्त काजोल देखील ‘द बिग पिक्चर’च्या मंचावर पाहुणी म्हणून दिसणार आहे. रणवीर ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातील काही सीन या कार्यक्रमाच्या मंचावर करतो. ‘ये लडकी है दिवानी’ आणि ‘बोले चुडिया’ या गाण्यांवर हे तिघेही डान्स करतात.
करण जोहर लवकरच ‘या’ चित्रपटाचे करणार दिग्दर्शन
करण जोहर लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत आहेत, तर त्याचा मागील चित्रपट ‘ए दिल है मुश्किल’ २०१६ मध्ये आला होता.
हेही नक्की वाचा-
- ‘या’ व्यक्तीने बिग बॉस फेम अर्शी खानच्या पोटात मारला जोरदार पंच, विव्हळत कोसळली खाली
- Video: देश बदललाय पण संस्कार तेच! परदेशी स्वयंपाक्यालाही प्रियांकाने आरती करायला शिकवले
- परिणीती चोप्राच्या भावाने उघडले रेस्टॉरंट, अभिनेत्री म्हणाली ‘मस्त खाल्ली बिर्याणी, दाल मखनी..’
हेही पाहा-










