Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड कपिलने गुरु रंधावाला करून दिली ‘त्या’ पार्टीची आठवण अन् क्षणात गायकाचा चेहरा झाला लालेलाल; वाचा संपूर्ण प्रकरण

कपिलने गुरु रंधावाला करून दिली ‘त्या’ पार्टीची आठवण अन् क्षणात गायकाचा चेहरा झाला लालेलाल; वाचा संपूर्ण प्रकरण

बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघी आणि पंजाबचा प्रसिद्ध गायक गुरु रंधावा हे दोघे नुकतेच सोनी टीव्हीच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. जिथे कपिलने गुरुबरोबर खूप चेष्टा-मस्करी केली. त्याचवेळी कपिलने गुरुला त्याच्यासोबत घडलेल्या त्या पार्टीचा किस्सा विचारला, जिथे पोलिसांनी रेड मारली होती. हे ऐकून गुरु इतका लाजला की त्याने आपला चेहरा लपवला.

सोनी टीव्हीवर येणारा ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांचा आवडता शो समजला जातो. कपिलच्या कार्यक्रमात बरेच कलाकार आणि गायक त्यांच्या चित्रपट आणि गाण्यांचे प्रमोशन करण्यासाठी येतात. कपिलही आलेल्या पाहुण्यांसोबत खूप मजा करत असतो आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी, तो त्यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारतो.

अलीकडेच कपिलच्या शोमध्ये पंजाबी गायक गुरु रंधावा आणि अभिनेत्री संजना सांघी पाहुणे म्हणून आले होते. यासंदर्भात एक व्हिडिओ सोनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कपिल या दोघांबरोबर मस्करी करताना दिसत आहे. त्यानंतर कपिल गुरुला विचारतो की, ‘आजकाल तुम्हाला गरिबांची पार्टी आवडते का कारण बादशहांची पार्टी तुम्हाला महागात पडली?’ कपिलचे हे शब्द ऐकून गुरू लाजून लाल झाला आणि हसत हसत आपला चेहरा लपवू लागला.

मुंबईच्या पार्टीत गुरूला झाली होती अटक
सन 22 डिसेंबर, 2020 रोजी रात्री 2:30 वाजता मुंबईतील ड्रॅगनफ्लाय रेस्टोबार येथे झालेल्या पार्टीमध्ये पोलिसांनी रेड मारली. या पार्टीत गुरु रंधावा, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, डिझायनर सुझेन खान यांच्यासह पोलिसांनी 34 जणांना अटक केली होती. ही पार्टी कोरोनाच्या नियमांविरूद्ध केली जात होती. या पार्टीमध्ये गायक बादशाहही उपस्थित होता आणि पोलिसांना पाहून तो मागच्या दरवाजातून पळून गेला, असे माध्यमांमध्ये आले आहे.

सोमवारी कपिल दुसऱ्यांदा झाला वडील
सोमवारी (१ फेब्रुवारी) कपिल शर्माची पत्नी गिन्नी हिने एका मुलाला जन्म दिला. या दोघांचा हा दुसरा मुलगा आहे. यापूर्वी कपिल एका मुलीचा बाप झाला आहे. याची माहिती स्वत: कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आणि मित्रांना दिली.

कपिलने लिहिले की, “नमस्कार आज सकाळी आम्हाला देवाचा आशीर्वाद म्हणून मुलगा झाला. देवाच्या कृपेने मूल आणि आई दोघेही स्वस्थ आहेत. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांबद्दल सर्वांचे आभार, गिन्नी आणि कपिल.”

हेही वाचा-

गुड न्यूज! कपिल शर्मा दुसर्‍यांदा बनला बाबा; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘दबंग खान’ची टेस्ट! कपिल शर्माने सलमानला विचारली कॅटरिनाच्या ६ बहिणींची नावे; पाहा पुढे काय झालं

‘असा’ दिसत होता २८ वर्षांपूर्वी कपिल शर्मा; रियॅलिटी शो जिंकल्यानंतर मिळाले होते तब्बल ‘इतके’ लाख रुपये, पहिल्याच कष्टाच्या कमाईतून केले होते बहिणीचे लग्न

हे देखील वाचा