Saturday, October 26, 2024
Home बॉलीवूड अरेरे! इतकी सैल जीन्स, की तिला पकडून अभिनेत्रीला करावं लागलं फोटोशूट, फोटो आले समोर

अरेरे! इतकी सैल जीन्स, की तिला पकडून अभिनेत्रीला करावं लागलं फोटोशूट, फोटो आले समोर

बॉलिवूड अभिनेत्री आयशा शर्मा (Aisha Sharma) क्वचितच रुपेरी पडद्यावर दिसली असेल, मात्र सोशल मीडियावर सर्वत्र तिच्या बोल्डनेसची चर्चा असते. ती अनेकदा तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांना दाखवत असते. अशातच आता आयशा शर्माने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंना प्रचंड लाईक आणि शेअर केले जात आहेत.

सैल जीन्स घालून केलं फोटोशूट
फोटोंमध्ये आयशा शर्मा डेनिम टॉपमध्ये दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग कलरची जीन्स घातली आहे. तिने जीन्स दोन्ही हातांनी धरून फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. आयशाचा हा लूक खूप पसंत केला जात आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. त्याचवेळी काही लोकांचे लक्ष तिच्या जीन्सकडे गेले, जी साईझने थोडी मोठी दिसते. यावर एका युजरने लिहिले की, “पँटची साईझ मोठी आहे, त्यामुळे तू धरून ठेवलंय.” अशाप्रकारे अनेकांनी कमेंटमध्ये म्हटले की, “तुझ्या साईझची पॅन्ट घालत जा!” (aisha sharma wears loose jeans share photos)

नेहा शर्माची बहीण आहे आयशा
आयशा शर्मा ‘तुम बिन २’ फेम अभिनेत्री नेहा शर्माची धाकटी बहीण आहे. आयशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिचा जन्म बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात झाला. तिचे बालपण दिल्लीत आजी-आजोबांसोबत गेले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली. आयशा अनेकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बहीण नेहासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

जॉन अब्राहमसोबत केलंय काम
विशेष म्हणजे, २०१८ मध्ये रिलीझ झालेल्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात आयशा शर्मा शेवटची दिसली होती. या चित्रपटात तिने जॉन अब्राहमच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती, ज्यात तिचे काम खूप पसंत केले गेले. ती बर्‍याच काळापासून चित्रपटापासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे आणि तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांची मने जिंकत असते.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा