Sunday, September 27, 2026
Home › अन्य › ‘छम्मा छम्मा’ गाण्यावर क्रिकेटपटू युझवेंद्र चहलच्या बायकोने धरला ठेका, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

‘छम्मा छम्मा’ गाण्यावर क्रिकेटपटू युझवेंद्र चहलच्या बायकोने धरला ठेका, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

व्यवसायाने डॉक्टर आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही तिच्या उत्कृष्ट नृत्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. धनश्रीच्या इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या २५ लाखांहून अधिक तर युट्युब वर तिचा चाहतावर्ग २० लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर खूप अग्रेसर असल्याचे दिसून येते.

तिने पोस्ट केलेल्या प्रत्येक व्हिडीओला तिच्या चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळत असतो. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग बॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही असं म्हणायला वावगं ठरणार नाही.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या ‘बुर्ज खलिफा’ या गाण्यावर तसेच ‘परी हू मै’ या गाण्यावर देखील तिने डान्स केला होता. हा डान्स तिच्या चाहत्यांना इतका आवडला होता की, त्यात तिच्यावर चांगल्या कमेंट्सचा पाऊस पडला आणि तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल देखील झाला.

नुकताच तिने आपला नवीन व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर अपलोड केला असून या व्हिडीओमध्ये ती ‘चायना गेट’च्या ‘छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैंजनिया’ या जबरदस्त गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

या गाण्यात तिच्यासोबत दोन मुली देखील आहेत, ज्या मोकळ्या आकाशाखाली असलेल्या सुंदर पटांगणात तिच्यासोबत ताल धरताना दिसत आहेत. धनश्रीने या दोन्ही मुलींचे देखील आभार मानले. या व्हिडीओवर सुद्धा धनश्रीला तुफान प्रतिक्रिया मिळत आहेत. काही तासातच या व्हिडीओला साडे चार लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळून हजाराच्या घरात प्रतिक्रिया आल्या होत्या. या व्हिडीओवर चहलने देखील ‘ब्युटीफुल’ अशी कमेंट केली आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांनी गुरुग्राम मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार एकमेकांशी लग्न केले होते.

हे देखील वाचा