हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चाहत्यांशी संवाद साधत असतात. आपल्या चित्रपटांइतकेच ते कौटुंबिक बाबीही शेअर करताना दिसतात. सिनेसृष्टीत बच्चन कुटुंबाचा चांगलाच दबदबा आहे. आता या कूटुंबामध्ये आणखी एका सदस्याचे आगमन झाले असून, बिग बी अमिताभ बच्चन आजोबा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चनने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. त्यामुळे सध्या बच्चन कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नैना बच्चन हिने ‘रंग दे बसंती’ चित्रपटातील कुणाल कपूरसोबत (Kunal Kapoor) लग्न केले होते. आता दोघेही एका मुलाचे पालक बनले आहेत. यामुळे सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरने अमिताभ बच्चन यांचे बंधु अजिताभ बच्चन यांच्या मुलीशी विवाह केला होता. त्यानेच ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे. यासंबंधी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, “सर्व शुभचिंतकांना ही आनंदाची बातमी सांगताना आनंद होत आहे की, आम्ही एका मुलाचे पालक झाले आहोत. याबद्दल मी देवाचे आभार मानतो.” कुणालची ही पोस्ट व्हायरल होताच चित्रपटक्षेत्रातील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंगद बेदी, दृष्टी धामी, सुजैन खान, श्वेता बच्चन अशा अनेक दिग्गजांनी त्यांचे अभिनंदन केले.
कुणाल कपूरचा जवळचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने अभिनंदन करताना अनेक लव इमोजी शेअर केले आहेत. कुणाल कपूर आणि नैना बच्चन यांनी २०१५ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांनी ही गोड बातमी दिली आहे. कुणाल कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. मात्र तो आपल्या खासगी आयुष्याबद्दल खूप कमी वेळा बोलताना दिसून आला आहे.
हेही वाचा :









