Thursday, September 10, 2026
Home अन्य व्हिडीओ शेअर करत अंकिताने इंटरनेटवर वाढवली ‘धकधक’, तरीही चाहत्यांनी घेतले फैलावर

व्हिडीओ शेअर करत अंकिताने इंटरनेटवर वाढवली ‘धकधक’, तरीही चाहत्यांनी घेतले फैलावर

‘पवित्र रिश्ता’ मधील अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सोशल मीडियावर ती वारंवार तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चाहत्यांना वेड लावत असते. अलीकडेच तिने डान्सचा व्हिडिओ शेअर करुन इंटरनेटचा पारा वाढविला आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हिट गाण्यावर अकिंता किलर परफॉरन्स देताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता साडी नेसून ‘धक धक करने लगा’ वर नाचत आहे. अंकिताच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला.

अंकिता लोखंडेने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना, तिने लिहिले आहे, ‘मला वाटते की एखादा कलाकार नेहमीच एक कलाकार असतो, मग तो मोठ्या पडद्यावर असो किंवा छोट्या पडद्यावर किंवा इन्स्टाग्राम रीलवर. माधुरी दीक्षित मॅम, मी नेहमीच तुमची चाहती होते आणि नेहमी राहील.’

व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते तिचे कौतुक करीत आहेत. तसेच एकामागून एक गोड कमेंट्सही देत आहेत. परंतु असेही काही लोक आहेत जे तिला ट्रोल करीत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की ‘आम्हाला माहित आहे की तू मूवऑन केले आहे आणि ते तुझ्यासाठी आवश्यकही होते. सुशांतला तू विसरलीस हे चांगले केले, पण सुशांतचे चाहते अद्यापही त्याची आठवण काढतात आणि नेहमी काढत राहतील. तुझे हे रूप चाहत्यांना आवडत नाही. आनंदी राहा आणि सुशांतसाठी अश्रू वाहण्याचे नाटक करू नको.’

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ मधील अर्चनाच्या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. टीव्हीवर अनेक हिट शोज दिल्यानंतर अंकिताने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. ती कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात दिसली होती. चाहते आता तिच्या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

हेही वाचा-

‘न्यूड’ फोटोच्या मागणीला अभिनेत्री पूजा हेगडेची जबरदस्त प्रतिक्रिया; एकदा पाहाच

“‘केजीएफ: चाप्टर २’ केवळ चित्रपट नाही तर…”, चाहत्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; सोशलवर भन्नाट व्हायरल

हे देखील वाचा