Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमध्ये पदार्पणाला सज्ज झालीय सुहाना खान? ‘या’ व्हायरल फोटोने रंगवल्या चर्चा

बॉलिवूडमध्ये पदार्पणाला सज्ज झालीय सुहाना खान? ‘या’ व्हायरल फोटोने रंगवल्या चर्चा

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खानची (Suhana Khan) लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. तर दुसरीकडे, सुहाना गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉलिवूड पदर्पणामुळे चर्चेत आहे. अशातच आता सुहानाचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे तिच्या बॉलिवूड पदर्पणाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

सुहाना खानचे फोटो व्हायरल
खरं तर, सुहाना खान शुक्रवारी (४ फेब्रुवारी) रात्री चित्रपट निर्माती झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) ऑफिसबाहेर दिसली होती, ज्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यादरम्यान सुहाना खानने तिच्या ड्रेसिंग स्टाइलने चाहत्यांना वेड लावले. पांढऱ्या टँक टॉप आणि कार्गो पँटमध्ये सुहाना खान खूपच ग्लॅमरस दिसत होती. (suhana khan spotted outside zoya akhtar office is she going to bollywood debut)

चित्रपटासाठी उत्सुक आहेत सुहानाचे चाहते
गेल्या अनेक दिवसांपासून सुहाना खान झोया अख्तरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. आता हा फोटो व्हायरल झाल्याने या बातमीला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. सुहानाचे चाहते तिच्या पदार्पण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘या’ चित्रपटातून करणार पदार्पण?
माध्यमातील वृत्तानुसार, सुहाना खान बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात झोया अख्तरच्या चित्रपटातून करणार आहे, जो आर्ची कॉमिक्सवर आधारित आहे. बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील या चित्रपटात दिसणार असल्याचे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलीय प्रतिभा
विशेष म्हणजे सुहाना खानलाही वडील शाहरुख खानप्रमाणे चित्रपटसृष्टीत आपले नाव कमवायचे आहे. याआधी तिने ‘द ग्रेट पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्टफिल्ममध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

हेही वाचा :

हे देखील वाचा