Friday, March 20, 2026
Home बॉलीवूड काय सांगता! ग्लॅमर क्वीन उर्फी जावेद गोल फेरे मारता मारता आदळली जमिनीवर, मग पुढे…

काय सांगता! ग्लॅमर क्वीन उर्फी जावेद गोल फेरे मारता मारता आदळली जमिनीवर, मग पुढे…

‘बिग बॉस ओटीटी’ फेम आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi javed) तिच्या ड्रेस सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या वेगवेगळ्या ड्रेसमुळे तिला अनेकवेळा ट्रोलिंगच देखील सामना करावा लागतो. अनेकवेळा ती विमान तळावर स्पॉट होत असते.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे बोल्ड व्हिडिओ देखील अनेकवेळा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती वेगळ्याच गोष्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती गोल गोल फिरताना दिसत आहे. ती हे गोल फेरे उभे राहून नाही तर बसून मारत आहे. खास गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टी उर्फी एन्जॉय करताना दिसत आहे. (Urfi Javed fall on flour during video viral on social media)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अभिनेत्रीने काळ्या रंगाची ब्रालेट आणि जीन्स घातली आहे. ती फरशीवर बसून गोल गोल फिरताना दिसत आहे. फिरता फिरता तिला चक्कर येते आणि खाली पडते. परंतु पडल्यानंतर तो जोर जोरात हसू लागते. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “मम्मी की रोटी गोल-गोल…मेरे फोटोग्राफर मेरा इंतजार करते हुए की कब मैं ये नॉनसेंस खत्म करूं ताकी हम शूट खत्म कर सकें.”

यातच उर्फीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ब्लॅक लेदर ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच तिने हाय हिल्स घातले आहे. हाय हिल्स घातल्याने तिचा तोल जातो. तिचा हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा