दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार (Ajith Kumar) आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे अनेक चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले असून यामधील त्याच्या दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली होती. प्रचंड मोठा चाहता वर्ग असलेल्या अजित कुमारचा बहुचर्चित ‘वलीमई’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, सध्या सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे.
दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारचा ‘वलीमई’ चित्रपट बर्याच दिवसांपासुन चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही. कारण चित्रपट सिनेमागृहात यायला सज्ज झाला असला, तरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तारीख निश्चित केली जात नव्हती. हा चित्रपट ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, मात्र आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे.
Hey Ajith, your conviction and tenacity remain commendable! Here’s wishing you the best for #Valimai. #AjithKumar @BoneyKapoor
Love always,
Ajay pic.twitter.com/B5OHJPX3pe— Ajay Devgn (@ajaydevgn) February 10, 2022
अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgan) या ‘वलीमई’ चित्रपटाचा ट्रेलर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रदर्शित केला आहे. त्या आधी काही काळापूर्वी अभिनेत्री हुमा कुरेशीने (Huma Qureshi) याबाबत माहिती दिली होती. “तुम्ही तुमचा गजर ६:३० वाजता लावून ठेवा, अजय देवगण वलीमई चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करत आहे.” असे कॅप्शन तिने आपल्या या पोस्टमध्ये लिहले होते.
Set the alarm for 6:30 PM! @ajaydevgn will be launching the #Valimai trailer in Hindi today.#Valimai #Valimai240222#ValimaiFromFeb24#AjithKumar #HVinoth @thisisysr @BayViewProjOffl @ZeeStudios_ @sureshchandraa @ActorKartikeya #NiravShah @RajAyyappamv pic.twitter.com/1lDcrTZNYh
— Huma S Qureshi (@humasqureshi) February 10, 2022
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी ३०० कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी याला नकार दिला होता. या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते, “प्रेक्षकांना आनंद देणे हेच आमचे उद्दिष्ट असून आमच्या कठीण काळात त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते. चित्रपटगृहात आमचा प्रेक्षक आनंदी राहील यासाठीच आम्ही प्रयत्नशील असतो. आम्ही त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी म्हणूनच हा निर्णय घेतो.”
या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार आणि हुमा कुरेशी प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. एच. विनोथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हेही वाचा-
- लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये ३५० कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…
- करण जोहरच्या ‘या’ कृतीमुळे संपूर्ण मंगेशकर कुटुंब झाले होते नाराज, स्टेटमेंट काढत विचारले होते अनेक प्रश्न
- ‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
हेही पाहा-