Sunday, June 22, 2025
Home मराठी ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्राजक्ता माळीने केला खास लूक, एकदा पाहाच

‘पावनखिंड’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्राजक्ता माळीने केला खास लूक, एकदा पाहाच

उत्कृष्ट सूत्रसंचालिका, अभिनेत्री आणि आता उत्कृष्ट कवयित्री म्हणून लोकप्रिय असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali) होय. अनेक मालिकांमध्ये, चित्रपटात काम केल्यानंतर प्राजक्ताचे अभिनय क्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण झाले आहे. आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. म्हणूनच ती चाहत्यावर्गात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिच्या देखण्या आणि सोज्वळ रूपाचे दर्शन ती तिच्या चाहत्यांना वारंवार देत असते. नुकतेच तिने तिची स्वतःची निर्मिती संस्था चालू केली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. अशातच तिचा एक नवीन ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी प्राजक्ताने खास लूक केला होता. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Prajkta mali’s special look for pawankhind movie promotion)

प्राजक्ताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. यावर तिने सुंदर असे ईअरिंग घातले आहे. तसेच केसांची वेणी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

हे फोटो शेअर करून तिने “पावनखिंड प्रमोशन, उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित,”असे कॅप्शन दिले आहे. पावनखिंड हा चित्रपट १८ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या, भोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

हे देखील वाचा