Saturday, September 12, 2026
Home साऊथ सिनेमा बोल्डनेसची सीमा पार! निक्की तांबोळीचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

बोल्डनेसची सीमा पार! निक्की तांबोळीचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनाही फुटला घाम

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या या फोटोवर आणि घायाळ करणार्‍या बोल्ड अदांवर चाहते नेहमीच फिदा होत असतात. यामध्ये अभिनेत्री निक्की  तांबोळी (Nikki Tamboli) आघाडीवर असते. आताही तिने आपला एक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

‘खतरों के खिलाडी’ आणि ‘बिग बॉस’सारख्या प्रसिद्ध कार्यक्रमातून निक्की तांबोळीला जोरदार प्रसिद्धी मिळाली होती. तेव्हापासुन ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. यावरुन ती आपल्या चाहत्यांशी नवनवीन फोटो शेअर करत असते. नुकताच तिने हिरव्या रंगाच्या पँट सूटमध्ये सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. तिने हा नवीन भन्नाट फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा घायाळ करणारा लूक पाहायला मिळत आहे.

याआधीही तिने अनेक फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले आहेत. मात्र या फोटोची बात काही औरच आहे. निक्कीने या फोटोसाठी शर्टलेस ब्लेजरसह सुंदर पँट घातली आहे. सोबतच तिच्या मनमोहक केसांमुळे ती जास्तच बोल्ड दिसत आहे. तिने हा फोटो आपल्या सोशल मीडियावरुन शेअर करताच तुफान वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. अवघ्या काही मिनिटांत या फोटोवर असंख्य प्रतिक्रिया आणि लाईक्स पाहायला मिळाल्या आहेत. हा मनमोहक फोटो निक्कीने एका प्रसिद्ध मासिकासाठी शूट केल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही तिने असे अनेक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या फॅशन आणि स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते फिदा होताना दिसत असतात. तिच्या लूक सोबतच स्टायलिश कपड्यांची नेहमीच चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. या फोटोमध्ये ही तिच्या दमदार लूकची सगळीकडे चर्चा होत आहे. निक्कीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. २१ ऑगस्ट १९९६ मध्ये निक्कीचा जन्म झाला. तिने ‘कंचना ३’, ‘बिग बॉस १४’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात आणि कार्यक्रमात काम केले आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा