Wednesday, February 11, 2026
Home बॉलीवूड दिया मिर्झाच्या मुलाचा क्यूट फोटो पाहिलात का? पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

दिया मिर्झाच्या मुलाचा क्यूट फोटो पाहिलात का? पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

दिया मिर्झा (Dia Mirza ) ही हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. अलिकडेच दिया मिर्झाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून सध्या ती मातृत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. आपल्या मुलासोबत ती अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. मात्र आजपर्यंत तीने आपल्या मुलाचा चेहरा दाखवला नाही. त्यामुळेच तिच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती. आता दियाच्या चाहत्यांची ही इच्छा  पूर्ण  झाली असून दियाने आपल्या मुलाचा एक गोंडस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून हा फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री दिया आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवरून छोट्या मुलाचा अव्यानचा एक गोंडस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तो सोफ्यावर बसलेला दिसत आहे. त्याची गोंडस आणि सुंदर अदा सगळ्यांनाच मोहित करत आहे. त्याचबरोबर तो कॅमेऱ्याकडे बघत पोजही देत आहे. पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये तो खूपच क्यूट दिसत आहे. या फोटोसोबत दियाने एक सुंदर कॅप्शन दिला आहे.

या कॅप्शनमध्ये दियाने “एक नवीन सुरूवात, खूप खूप प्रेम आणि आभार, आमच्याकडे येण्यासाठी खूप खूप आभारी आहे,” अशा शब्दात आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये दियाने पती वैभव रेखीलाही टॅग केले आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. फक्त चाहतेच नव्हे, तर अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकारांनीही या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री प्रियांका चोप्राने “हॅलो बाळा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.तर नेहा धुपियाने यावर प्रतिक्रिया देताना “किती गोड” अशी मस्त प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोवर करीना कपूर, बिपाशा बसू अशा अनेक अभिनेत्रींनी प्रतिक्रिया दिली आहे.  दिया आणि वैभवने २०२१ मध्ये अत्यंत साध्या पद्धतीने विवाह केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

 

 

हे देखील वाचा