Monday, June 1, 2026
Home टेलिव्हिजन नेहा भसीनच्या ‘या’ कृत्यामुळे शमिता शेट्टीची झाली गोची, कॅमेऱ्यासमोरच अभिनेत्रीला…

नेहा भसीनच्या ‘या’ कृत्यामुळे शमिता शेट्टीची झाली गोची, कॅमेऱ्यासमोरच अभिनेत्रीला…

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये नेहा भसीन (Neha Bhasin) आणि शमिता शेट्टी ( Shamita Shetty)  यांनी चांगलीच धमाल केली होती. या कार्यक्रमात त्यांची जमलेली गट्टी प्रत्येकाच्या लक्षात आली होती. दोघींनी ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वातही प्रवेश करत कार्यक्रमाची रंगत वाढवली होती. कार्यक्रमात या दोघींच्यात घट्ट मैत्री झाल्याचे पहायला मिळाले. अलिकडेच शमिता आणि नेहा आयकॉनिक गोल्ड अवॉर्डमध्ये एकत्र झळकल्या होत्या. यावेळी दोघींचा स्टाइलिश आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. त्याचबरोबर त्यांच्या मैत्रीची खास झलकही पाहायला मिळाली. 

नेहा भसीन आणि शमिता शेट्टी यांनी ‘बिग बॉस १५’ चांगलेच गाजवले. या कार्यक्रमात नेहा आणि शमीता यांच्या मैत्रीचीही चांगलीच चर्चा झालेली पाहायला मिळाली. दोघीही कार्यक्रमात सतत सोबत फिरताना दिसल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात एकत्र दिसल्या होत्या. यावेळी नेहाच्या सिल्वर रंगाच्या जंपसूटनवर आणि शमिता शेट्टीच्या शिमरी गाउनवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नेहाने रेड कार्पेटवर जोरदार फोटोशूट केले ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शमीता आणि नेहाच्या लूकने सगळ्यांनाच मोहित केले आहे. या व्हिडिओमध्ये नेहा आपली खास मैत्रिण शमीताला किस करताना दिसत आहे. ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

या व्हिडिओमध्ये नेहा शमिताच्या गालावर किस करताना दिसत आहे. नेहाच्या या कृतीने गोंधळलेली दिसत आहे. याचवेळी नेहा शमिताच्या गालावरील लिपस्टीकचा डाग पुसताना दिसत आहे. मात्र यावेळी तिला असे करण्यापासून रोखत त्याची काळजी करू नकोस बाळा, असे म्हणत शमिता तिला प्रेमाने मिठी मारत आहे. सध्या त्यांच्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा रंगली आहे. नेहा आणि शमिताच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या दोघी फक्त कॅमेऱ्यासाठीव दिखावा करतात असे म्हटले आहे, तर काही जणांनी त्यांच्या मैत्रीचे कौतुक केले आहे. दरम्यान दोघींचीही बिग बॉसच्या घरातील कामगिरी समाधानकारक नव्हती त्यामुळे त्यांना लवकर घरातून बाहेर पडावे लागले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा