Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारने ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले, ‘मी लवकरच सिनेमा…’

अक्षय कुमारने ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले, ‘मी लवकरच सिनेमा…’

सध्या सगळीकडे विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाची चर्चा रंगली आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट शेवटी प्रदर्शित झाला असून सगळीकडे जोरदार कमाई करताना दिसत आहे. आता अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आता या चित्रपटाचे कौतुक अक्षय कुमारने केले आहे जो त्याच्या आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वास्तविक अक्षय कुमारने अनुपम खेर आणि द काश्मीर फाइल्सचे कौतुक करणारा संदेश लिहिला आहे. काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला.

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही पण लवकरच तो चित्रपट पाहणार आहे. काश्मीर फाइल्स हा खूप चांगला चित्रपट आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तो चांगला व्यवसाय करत आहे. प्रेक्षक पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला येत आहेत याचा मला आनंद आहे,” असेही अक्षय कुमार म्हणाला. त्याने पुढे लिहिले, अनुपम खेर तुमच्या अभिनयाबद्दल मी खूप ऐकत आहे. लोक थिएटरमध्ये बघायला येत आहेत ही खूप छान गोष्ट आहे. मी लवकरच बघेन.”

याआधी चित्रपटाशी संबंधित एक फोटो शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले होते की, ‘लोकांचे प्रेम, काश्मिरी हिंदूंचे अश्रू, विवेक रंजन अग्निहोत्री यांचा संयम, द काश्मीर फाइल्सच्या संपूर्ण टीमची मेहनत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबा भोलेनाथांचे आशीर्वाद खरे ठरले. 30 वर्षांनंतर कधी ना कधी विजय मिळायचाच होता. ओम नमः शिवाय” याआधी ‘द काश्मीर फाइल्स’ने बॉक्स ऑफिसवर ३ कोटींची कमाई केली आहे. यानंतर शनिवारी 8.25 कोटींची कमाई झाली आहे. त्याचबरोबर चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग जवळपास भरले आहे. याचे कारण म्हणजे हा चित्रपट लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

                        दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा