Monday, September 14, 2026
Home टेलिव्हिजन लीडरशिपची शिकवणी देणाऱ्या पायल रोहितगीवर साधला कंगनाने जोरदार निशाणा, म्हणाली…

लीडरशिपची शिकवणी देणाऱ्या पायल रोहितगीवर साधला कंगनाने जोरदार निशाणा, म्हणाली…

कंगना रनौतचा ‘लॉकअप’ हा शो ओटीटीवर सुरु झाला आणि लगेचच तुफान चर्चेत आला. हा शो जितका लोकप्रिय होत आहे तितकाच तो त्यात होणाऱ्या भांडणांमुळे आणि धक्कादायक खुलाशांमुळे तुफान गाजत आहे. कंगना पहिल्यांदाच अशाप्रकारचा शो होस्ट करत आहे ज्यात अनेक वादग्रस्त आणि मोठी नाव असलेले कलाकार सहभागी झाले आहेत. सध्या या शोमध्ये कंगनाने पायल रोहतगीवर निशाणा साधला आहे.

पायल ज्या पद्धतीने या शोमध्ये खेळ खेळत आहे ते पाहून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावरील आपल्या बेबाक अंदाजामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे ओळखल्या नाऱ्या पायल रोहितगिणे आता कंगनासोबत पंगा घेतला आहे. नुकताच कंगनाने मध्ये मध्ये तिला बोलताना टोकणाऱ्या पायलला चांगलेच सुनावले आहे. शोच्या पहिल्याच भागात पायलने कंगनाला उलट उत्तर दिले होते. आता कंगनाने पायलला सल्ला देताना काही गोष्टी सांगितल्या आहेत.

या शोच्या एका भागात कंगनाने म्हटले की, पायल नेहमीच हातात झेंडा घेऊन तयारच असते की लीडर ती आहे, आणि कोणाचेच ऐकत नाही’ हे ऐकून पायलने देखील यावर कंगनाला प्रत्युत्तर दिले आहे. पायलने कंगनाला लीडरशिपचा खरा अर्थ समजावयचा प्रयत्न देखील केला. हे पाहून कंगना जास्त चिडली आणि म्हणाली, “हा शो तू नाही चालवत आहेस. तू मला सांगू नकोस शो कसा चालवायचा आणि काय करायचे. काय मूर्खपणा आहे हा.” यानंतर पायल थोडी शांत होते. हे पाहून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की या दोघींमध्ये सर्व काही आलबेल नाही.

काही दिवसांपूर्वीच करणवीर बोहरा आणि पायल यांच्यामध्ये तुफान राडा झाला होता. या दरम्यान करणवीरने पायलला जोर का गुलाम पाहिजे असे देखील म्हटले होते. करणवीर आणि पायलमध्ये झालेल्या वादामुळे पायलचा बॉयफ्रेंड असलेल्या संग्राम समेळने त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करत पायल आणि संग्राम जुलैमध्ये लग्न करतील असे सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा