Monday, January 19, 2026
Home साऊथ सिनेमा बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टार कलाकारांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये केल्या फक्त नावापुरत्याच भूमिका

बॉलिवूडच्या ‘या’ सुपरस्टार कलाकारांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये केल्या फक्त नावापुरत्याच भूमिका

सध्या मनोरंजन क्षेत्रात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने सर्वत्र जोरदार धुमाकूळ घातला आहे. एकापाठोपाठ एक दमदार चित्रपटांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. बाहुबली, आरआरआर, पुष्पा सारख्या धमाकेदार चित्रपटांच्या यादीने सर्वांनाच मोहित केले आहे. जबरदस्त अभिनय, नाविण्यपुर्ण कथालेखन आणि अप्रतिम दिग्दर्शन यासगळ्या गोष्टींमुळे देशातला प्रेक्षक सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे आता देशात सर्वोत्कृष्ठ समजल्या जाणाऱ्या बॉलिवूडच्या कलाकारांची चर्चा आणि लोकप्रियता कमी झाल्याचेच चित्र तयार झाले आहे. अनेक हिंदी कलाकारांनी आता काळाची पावले ओळखत दाक्षिणात्य चित्रपटांत काम केले आहे. मात्र त्यांना या चित्रपटांत फक्त सहकलाकार म्हणूनच ओळख मिळाली आहे. अलिकडच्या काळात असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये बॉलिवूडच्या कलाकार फक्त नावालाच दिसले आहेत. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ. 

आलिया भट्ट (Alia Bhatt)- हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टनेही दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत पदार्पण केले आहे. अलिकडेच गाजलेल्या आरआरआर चित्रपटात आलियाने भूमिका साकारली आहे. मात्र ज्या पद्धतीने या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. त्यावरुन आलियाची जोरदार भूमिका असेल असे वाटत होते मात्र चित्रपटातील आलियाची भूमिका खूपच कमी वेळात संपली ज्याची चर्चाही झाली नाही. त्यामुळे या चित्रपटात आलियाची भूमिका फक्त नावालाच राहिली.

अजय देवगण (Ajay Devgn)-  अभिनेता अजय देवगणचे बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत, त्याने एकापेक्षा जास्त चमकदार भूमिका केल्या आहेत, परंतु RRR चित्रपटात देखील त्याची चमक कमी होताना दिसली. आलियाप्रमाणेच अजय देवगणही केवळ छोट्या भूमिकेत दिसला. मात्र, या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजय देवगणही खूप चर्चेत होता.

सुनील शेट्टी (Sunil Shetty) –   हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सशक्त व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखला जाणारा बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मरक्कर’ या चित्रपटात दिसला, अशा दिग्गज अभिनेत्याने ज्या प्रकारची भूमिका साकारायला हवी, महत्त्वाची व्यक्तिरेखा त्याला मिळायला हवी होती. तो चित्रपटात फारसा दिसला नाही आणि त्याच्या भूमिकेचे फारसे कौतुक झाले नाही.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)- बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय लवकरच साऊथच्या PS-1 या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तिला चांगले स्थान मिळाले आहे आणि लूक पाहूनही चित्रपटात तिची भूमिका दमदार असणार आहे असे वाटते. पण ऐश्वर्या दमदार भूमिकेत दिसते की नाही हे चित्रपटात आल्यानंतरच कळेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

‘द वाँटेड’ गायक टॉम पार्करचे झाले निधन, दीर्घकाळापासून मेंदूच्या कर्करोगाने होता ग्रस्त

विल स्मिथच्या ‘ऑस्कर’ प्रकरणावर समीरा रेड्डीने दिल्ली प्रतिक्रिया, ‘या’ महाभयंकर आजाराचाही केला उल्लेख

टीव्हीनंतर आता मोठ्या पडद्यावर धमाल करणार श्वेता तिवारी, मिळाली ’ही’ मोठी ऑफर 

हे देखील वाचा