Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड Fraud | रिमी सेन ठरली मोठ्या शिकाराची बळी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Fraud | रिमी सेन ठरली मोठ्या शिकाराची बळी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

‘धूम’ चित्रपटातून इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करणाऱ्या रिमी सेनला (Rimi Sen) आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. सध्या ही अभिनेत्री चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असतानाही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. रिमी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असते.

पुन्हा चर्चेत आली रिमी
मात्र, यावेळी रिमी तिच्या कोणत्याही पोस्टमुळे नाही, तर फसवणूक प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अभिनेत्री फसवणुकीची बळी ठरली आहे. रिमी सेनचे ४.४० कोटींचे नुकसान झाले आहे. वास्तविक, अभिनेत्रीने गोरेगावच्या एका व्यावसायिकावर ४.१४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. (dhoom actress rimi sen cheated for 4 crore know full matter)

रिमी ठरली फसवणूकीची बळी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिमीसोबत ही घटना २९मार्च रोजी घडली होती. यानंतर अभिनेत्रीने विशेष पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

जिममध्ये झाली बिझनेसमॅनसोबत भेट
तक्रार दाखल करताना, अभिनेत्रीने सांगितले की त्या व्यक्तीने तो बिझनेसमॅन असल्याचा दावा केला आणि तिला ४०% परतावा देऊन त्याच्या कंपनीत गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. यानंतर अभिनेत्रीने त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवले. मुदतीनंतर, रिमीने तिच्याकडून नफ्याचे पैसे मागितले, तेव्हा त्याने अभिनेत्रीचे कॉल उचलणे बंद केले.

वृत्तानुसार, या व्यक्तीविरुद्ध आयपीसी कलम ४२० आणि ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा शोध सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा