Sunday, June 22, 2025
Home नक्की वाचा या सुंदरी बनल्यात कपूर घराण्याच्या सुना, बघा आलियाचा नंबर कितवा

या सुंदरी बनल्यात कपूर घराण्याच्या सुना, बघा आलियाचा नंबर कितवा

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. प्रत्येकजण त्यांच्या लग्नाची प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची प्रतीक्षा करत आहे. अशा परिस्थितीत, त्यांच्या लग्नासोबतच, कपूर कुटुंबात ज्या अभिनेत्रींनी एकेकाळी प्रवेश केला, कपूर घराण्याच्या मुलांनी ज्यांना नववधू बनवले, अशा सर्व अभिनेत्रींची झलक आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आज आम्ही बातमीत कपूर घराण्याच्या सुनेबद्दल बोलणार आहोत. जाणून घेऊया की, आलियाच्या आधी कोणकोणत्या अभिनेत्री कपूर घराण्याच्या सूनबाई बनल्या आहेत.

कृष्णा राज कपूर (Krishna Raj Kapoor)
साल १९४६ मध्ये, राज कपूरची (Raj Kapoor) वधू कृष्णाने कपूर घराण्यात सून म्हणून पाऊल ठेवले. त्यानंतर तिने ५ मुलांना जन्म दिला. ऋषी कपूर, राजीव कपूर आणि रणधीर कपूर अशी ३ मुले. तर रितू नंदा आणि रीमा जैन नावाच्या २ मुली. (these are the actresses who became kapoors daughter in law)

गीता बाली (Geeta Bali)
शम्मी कपूरने (Shammi Kapoor) १९९५ मध्ये गीता बालीसोबत लग्न केले. गीता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या.

जेनिफर केंडल (Jennifer Kendall)
जेनिफर केंडलने १९५८ मध्ये शशी कपूरशी (Shashi Kapoor) लग्न केले. पण १९८४ मध्ये कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले.

बबिता (Babita Kapoor)
आता दुसऱ्या पिढीबद्दल बोलूया. बबिता रणधीर कपूरशी (Randhir Kapoor) लग्न करून, कृष्णा राज कपूरच्या सून बनल्या. मात्र काही वेळाने दोघेही वेगळे झाले.

नीतू कपूर (Neetu Kapoor)
ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी अगदी लहान वयात नीतू कपूरशी लग्न केले. वयाच्या २१ व्या वर्षी नीतू कपूरने ऋषी कपूर यांच्याशी लग्न करून मोठे पाऊल उचलले होते. लग्नानंतर नीतू कपूरने फिल्मी दुनियेला राम राम ठोकला आणि आपलं संपूर्ण आयुष्य पतीच्या नावावर केलं. पण ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूरने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

आलिया भट्ट
आणि आता लवकरच या यादीत आलिया भट्टचे नाव देखील जोडले जाणार आहे. रणबीर कपूर आलिया भट्टला आपली वधू बनवून कपूर कुटुंबाची सून बनवणार आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा