Sunday, June 22, 2025
Home साऊथ सिनेमा धाडस असावं तर असं! ‘केजीएफ’ फेम यशने सिंहाला चारले जेवण; व्हिडिओ पाहून तुम्हीही द्याल हिंमतीला दाद

धाडस असावं तर असं! ‘केजीएफ’ फेम यशने सिंहाला चारले जेवण; व्हिडिओ पाहून तुम्हीही द्याल हिंमतीला दाद

साऊथ सुपरस्टार यशने (Yash) आपल्या स्टाईलने सर्वांनाच वेड लावले आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. चाहते त्याच्या ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. दरम्यान, सुपरस्टार यश गेल्या काही दिवसांत आपल्या कुटुंबासह दुबईच्या ट्रिपवर गेला होता. तेथून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच यश आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक डेट नाईटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता.

यशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता, जो पुन्हा चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, यश सिंहाला खायला घालताना दिसत आहे. (kgf chapter 2 star yash feeds lion in his dubai trip and netizens)

पांढऱ्या सिंहाला खायला घालताना दिसला ‘केजीएफ’ स्टार
यशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने लाल शर्ट परिधान केलेला आहे. यासोबत तो जवळच उभ्या असलेल्या पांढऱ्या सिंहाला खायला चारताना दिसत आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडत आहे. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले की, “एक सिंह दुसऱ्या सिंहाबरोबर.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “क्या बात है भाई.” या व्हिडिओला आतापर्यंत ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

‘केजीएफ २’ १४ एप्रिलला चित्रपटगृहात दाखल
यापूर्वी सुपरस्टार यशचा ‘केजीएफ २’ चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, पण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चित्रपटाच्या प्रदर्शनाला ब्रेक लावला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाच्या तारखेची मोठी घोषणा केली होती. निर्मात्यांनी सांगितले होते की, सुपरस्टार यशचा चित्रपट ‘केजीएफ २’ आता १४ एप्रिल, २०२२ रोजी रुपेरी पडद्यावर दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील आहेत. बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त (Sanjay Dutt) या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला आहे, तर अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीही (Srineedhi Shetty) महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. तसेच अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) या चित्रपटात राजकारणाच्या भूमिकेत दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा