Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड बाबो! आलिया भट्टचा लेहेंगा बनवायला लागलेत तब्ब्ल ३००० तास, डिझाईन करायला वापरलंय खरं सोनं आणि चांदी

बाबो! आलिया भट्टचा लेहेंगा बनवायला लागलेत तब्ब्ल ३००० तास, डिझाईन करायला वापरलंय खरं सोनं आणि चांदी

या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. अनेकांची लग्न झाली तर अनेकांच्या घरी नवीन पाहुण्यांचे स्वागत झाले. मागील अनेक दिवसापासून बॉलिवूडमधील एका लग्नही जोरदार चर्चा चालू होती. ते लग्न म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे लग्न. गेले ५ वर्ष ते दोघे रिलेशनमध्ये आहेत. परंतु त्यांनी या बाबत कोणालाही कसलीच कल्पना दिली नाही. लग्नाबाबतही त्यांनी खुप गुप्तता राखली. अगदी ठराविक लोकांच्या उपस्थितीत त्यांनी रणबीर कपूरच्या वास्तू बंगल्यावर विवाह केला. लग्नाबाबत सगळ्याच गोष्टी एगदी परफेक्ट होत्या.

लग्नानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले. तसेच आता हळूहळू त्यांच्या बाकी फंक्शनचे फोटो देखील समोर येत आहेत. अशातच रणबीर आणि आलियाच्या मेहेंदी फंक्शनचे काही फोटो शेअर केले आहेत. यात आपण पाहू शकतो की, आलिया खूपच सुंदर दिसत आहे, तिने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे. तसेच त्यावर हिरव्या रंगाची डायमंड ज्वेलरी घातली आहे. तिने हातावर मेहेंदी काढलेली दिसत आहे. या सगळ्या फंक्शनमध्ये आलियाच्या हा लेहेंगा सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

डिझायनर मनीष मल्होत्राने तिचा हा लेहेंगा डिजाईन केला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. तिचा हा लेहेंगा १८० पॅचेस वापरून तयार केला आहे. बिना ओढणीचा हा लेहेंगा खूपच सुंदर दिसत आहे. मनीष मल्होत्राने दिलेल्या माहितीनुसार, आलियाचा हा लेहेंगा बनवण्यासाठी तब्बल ३००० तास लागले आहेत. यावर असलेली डिझाईन हाताने तयार केली आहे. यावर सोने आणि चांदीने नक्षी तयार केली आहे. यावर तिने डिझायनर बॅकलेस ब्लाउज घातला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा