Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड केजीएफ स्टार यशची लव्हस्टोरी आहे खूपच रंजक, फोनवर बोलताना यशने केले होते राधिकाला प्रपोज

केजीएफ स्टार यशची लव्हस्टोरी आहे खूपच रंजक, फोनवर बोलताना यशने केले होते राधिकाला प्रपोज

सध्या बॉलिवूडच्या मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकून दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कब्जा केल्याचे चित्र दिसत आहे. आधी ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि आता ‘केजीएफ २’ एका पाठोपाठ एक अशा ती साऊथच्या चित्रपटांनी धमाका करत हॅट्रिक केली आहे. आरआरआर सिनेमानंतर आता ‘केजीएफ २ ने कमाईचा तडाखा लावला असून, प्रदर्शनाच्या काही दिवसातच कमाईचे नवनवीन रेकॉर्ड केले आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिससोबतच सोशल मीडियावरही चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. अतिशय सध्या घरातून वर येत यशने हे आभाळाएवढे मोठे यश संपादन केले आहे. आजही एवढे यश मिळवलेला अभिनेता यश जमिनीवर पाय रोवूनच उभा असल्यामुळे त्याचे सतत कौतुक होते. आज या लेखातून आपण यश आणि त्याची पत्नी असलेल्या राधिका पंडित यांच्या प्रेमकहाणीबद्दल.

यशाची पत्नी राधिका दिसायला खूपच सुंदर असून ती मोठमोठ्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकताना दिसते. राधिका देखील कन्नड इंडस्ट्रीमधील मोठी, लोकप्रिय अभिनेत्री आहे. यशची राधिकाशी पहिली भेट एका शूटवेळी झाली होती. राधिका त्यावेळी टीव्ही मालिका असणाऱ्या ‘नंदा गोकुळ’मध्ये काम करत होती. त्यावेळी यशला मालिकेतून रिप्लेस करण्यात आले होते. २००८ मध्ये दोघांनी ‘Moggina Manasu’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. २०१२ मध्ये चित्रपट ‘Drama’ मध्ये जेव्हा यशला साईन करण्यात आले.

या सिनेमामध्ये राधिकाने मुख्य अभिनेत्रीला रिप्लेस केले. हा या दोघांचा पहिला एकत्र चित्रपट होता. सोबत काम करत असताना या दोघांमध्ये मैत्री झाली आणि ते एकमेकांचे चांगले मित्र बनले. राधिकाला यश आधीपासूनच आवडत होता. यशने खूप रोमँटिक अंदाजात राधिकाला प्रपोज केलं होतं. त्यांची ही कहाणी रोमँटिक चित्रपटापेक्षा कमी नाही. यशला देखील राधिका खूपच आवडत होती. तो नेहमी तिला वेगवेगळ्या प्रकारे हिंट द्यायचा. पण, राधिकाला ही गोष्ट समजतच नव्हती. यशला नेहमीच राधिकाला त्याच्या मनातील भावना कशा आणि कुठे सांगायच्या याचा विचार करायचा. अखेर, त्याने व्हॅलेंटाईन-डेचा दिवस यशने नक्की केला आणि त्याच दिवशी त्याने राधिकाला प्रपोज करण्याचे ठरवले.

व्हॅलेंटाईन-डेला राधिकाला तिच्या पालकांसोबत मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेली होती. यशला राधिकासमोर आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. मात्र त्याला आपल्या प्रपोजलमुळे दोघांची मैत्री खराब होऊ नये म्हणून त्याची राधिकासमोर बोलण्याची हिंमतच होत नव्हती. यशने राधिकाला आवडणाऱ्या वस्तू खरेदी केल्या आणि तिला न देता तिच्या गाडीत त्या ठेवल्या. राधिका जेव्हा आपल्या गाडीमध्ये बसली तेव्हा तिला गिफ्टसोबत एक कार्डदेखील मिळाले. यावर लिहिलं होतं-“हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे!’ त्यानंतर एक दिवस खूप धाडसाने यशने फोनवरून राधिकाला प्रपोज केले. मात्र राधिकाने त्याच्या प्रपोजलचे उत्तर देण्यासाठी ६ महिने लावले.

राधिकाने यशला हजार दिल्यानंतर १२ ऑगस्ट, २०१६ रोजी दोघांनी गोव्यात साखरपुडा केला आणि ९ डिसेंबर २०१६ रोजी बंगलोरमध्ये लग्न केले. ‘बंगलोर पॅलेस’मध्ये एक ग्रँड वेडिंग रिसेप्शन दिले गेले होते. राधिका आणि यश यांना आयरा नावाची मुलगी तर यथर्व नावाचा मुलगा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा