बॉलिवूडमध्ये आपल्या ग्लॅमरस अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताचा (Tanushree Dutta) नुकताच अपघात झाला आहे. एकेकाळी तनुश्री दत्ता हे बॉलीवूडचे प्रसिद्ध नाव होते. तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यामधील तिच्या अभिनयाची आणि बोल्डनेसची नेहमीच चर्चा होत असते. मात्र नंतर तिने इंडस्ट्रीपासून दुर जाण्याचा निर्णय घेतला. तनुश्री दत्ता इंडस्ट्रीपासून दूर आहे, पण सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. यावरुनच तिने या अपघाताची माहिती दिली आहे. तिच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देत आपली चिंत व्यक्त केली आहे.
आता नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तनुश्री दत्ताने अपघाताची बातमी दिली आहे. तनुश्री दत्ताचा महाकालच्या दर्शनासाठी जाताना अपघात झाला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या अपघाताविषयी सांगितले आहे. यामागचे कारण सांगताना तनुश्री दत्ताने सांगितले की, “गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे तिचा अपघात झाला. दिवस खूपच अडचणीचा होता. शेवटी महाकालच्या दर्शनाला पोहोचलो. मंदिराकडे जाताना विचित्र अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने कारची धडक झाली. आत्ताच काही टाके पडले आहेत जय श्री महाकाल असा कॅप्शन देत तिने या अपघाताबद्दल सांगितले आहे.” या अपघातात अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झाली आहे, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
फोटो पाहून अभिनेत्रीच्या गुडघ्याला खोल दुखापत झाल्याचे स्पष्ट होत आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिचे चाहते आणि जवळचे लोक काळजीत पडले आहेत. तनुश्रीच्या पोस्टवर कमेंट करत तिला लवकर बरे होण्यासाठीही चाहत्यांनी प्रार्थना केल्या आहेत. तनुश्री दत्ताने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते . आशिक बनाया आपन हा तिचा पहिलाच चित्रपट प्रचंड गाजला. चित्रपटातील तिच्या बोल्डनेसची संपर्ण सिने जगतात .चर्चा रंगली होता. या चित्रपटात तनुश्रीसोबत इमरान हाश्मी आणि सोनू सूद दिसले होते. तनुश्रीने तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसमुळेच लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- राजबिंडा अभिनेता अजिंक्य देव वाढदिवस, असा आहे मराठी सिनेजगातील पहिल्या हॅण्डसम हिरोचा यशस्वी प्रवास
- अधुरी प्रेम कहाणी! नर्गिस दत्त यांच्या लग्नाची बातमी समजल्यानंतर राज कपूर स्वतःलाच देऊ लागले होते सिगारेटचे चटके
- जीवाची पर्वा न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्यासाठी मारली होती आगीत उडी, अशी सुरु झाली ही प्रेमकहाणी